बांगलादेश मधील हिंदूंच्या रक्षणाकरता तातडीने उपाययोजना करा 

आमदार सत्यजित तांबे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी 

संगमनेर दि.9 —

बांगलादेश मधील हिंदू धर्मियांचे अध्यात्मिक गुरु चिन्मय कृष्णदास यांना बांगलादेश सरकारने अत्यंत अन्यायकारक पद्धतीने अटक केली आहे. त्याचबरोबर तेथील अल्पसंख्यांक असलेला हिंदू धर्मियांवर सातत्याने विविध हल्ले होत आहेत. यामुळे बांगलादेश मधील हिंदू सह संपूर्ण जगभरातील हिंदू धर्मीय चिंतेत आहेत. तरी आपण तातडीने राजनैतिक हस्तक्षेप करून चिन्मय कृष्णदास यांच्या सुटकेबरोबर बांगलादेश मधील हिंदू धर्मियांना संरक्षण मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

आमदार सत्यजित तांबे यांनी बांगलादेश मधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बांगलादेश मधील आध्यात्मिक गुरू चिन्मय कृष्णदास यांना तेथील सरकारने अत्यंत अन्यायकारक पद्धतीने अटक केली आहे. त्याचबरोबर त्यांना तुरुंगात टाकले आहे. यामुळे केवळ त्यांच्या अनुयायींना त्रास झाला नाही तर बांगलादेश मधील समस्त हिंदू बांधवांच्या सुरक्षिततेबद्दल आणि कल्याणाबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे.

एक सहकारी माणूस आणि धार्मिक सहिष्णता आणि मानवी हक्कांना महत्त्व देणारा राज्याचा नेता या नात्याने आपणास विनंती आहे की, आपण भारत व बांगलादेश सरकार मधील उच्च अधिकाऱ्यांना तातडीने पत्र लिहून व योग्य राजनैतिक हस्तक्षेप करून बांगलादेश मधील हिंदू समाजाला मानवतावादी मदत आणि समर्थन देण्यासाठी तातडीने पुढाकार घ्यावा.

हिंदू धर्माच्या शिकवणीनुसार मानवता हाच धर्म अत्यंत महत्त्वाचा आहे . बांगलादेशमध्ये मात्र जाणीवपूर्वक कट्टरतावाद वाढवून राजकारणासाठी हिंदू धर्मियांना त्रास दिला जात यामुळे तेथील हिंदू धर्मीय असुरक्षित झाले आहे.

कट्टरतावादी अनेक नेते बेताल वक्तव्य करून हिंदू धर्मा विरोधी चिथावनी देत आहे. यामुळे अनेक ठिकाणी हिंदू बांधवांवर हल्ले होत आहेत. यामुळे तेथील हिंदू बांधव- महिला अत्यंत भयभीत वातावरणात आहे.

तरी आपण तातडीने राजनैतिक पातळीवरून या प्रकरणात हस्तक्षेप करून बांगलादेश मधील आध्यात्मिक धर्मगुरू चिन्मय कृष्णदास यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच बांगलादेश मध्ये होत असलेल्या हिंदू धर्मीयांचा छळ थांबवण्यासाठी महाराष्ट्र आणि देशाच्या वतीने तातडीने पुढाकार घेऊन तेथील हिंदू समाजाला सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वपूर्ण उपाययोजना करून तेथील हिंदू धर्मियांना दिलासा द्यावा ही विनंती आहे.

Oplus_131072

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!