श्री रामेश्वर विद्यालयाच्या माजी विद्यार्थीमेळावा उत्साहात
संगमनेर दि. 18
तालुक्यातील चणेगाव येथील Shri श्री रामेश्वर विद्यालयातील सन १९९५ ची इयत्ता १० ची बॅच असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी तत्कालीन माजी विद्यार्थी शिक्षकवृंद उपस्थित होते.

लोणी येथील के.बी ॲग्रो रिसॉर्ट येथे या स्नेह मेळाव्याच्या आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक हनुमान प्रधान होते. अनिता ढमक यांनी स्वागत केले. प्रास्ताविक सुभाष पाटोळे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

मुबंई स्थित असलेल्या राजेंद्र भोसले यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. या बॅचमधील अनेक माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. यावेळी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. तीस वर्षा नंतर एकत्र आलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या आठवणींना यावेळी उजाळा मिळाला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन ढमक यांनी केली केले आणि राजेश भोसले आणि विलास दिघे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

मेळाव्यास भानुदास तांबे हनुमान प्रधान,भाऊसाहेब कानडे, बापुसाहेब पर्वत, पुंजा तांबे, शंकर शिंदे हे शिक्षक उपस्थित होते. यावेळी संतोष वाघमोडे, सुनील कदम, शिवाजी ढमक, बाळासाहेब आहेर, बाळासाहेब खेमनर, मिरा वर्पे, शारदा गुळवे, साखरबाई गुळवे, उषा खेमनर, अलका सिनारे, साखरबाई खेमनर, नंदा ढमक, सुनिता गुळवे सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

