साहित्य – साधनांमुळे डोळस माणसांप्रमाणेच आम्ही वावरतोय – कडलग
संगमनेर दिनांक – 4
साहित्य साधनांच्या उपलब्धतेमुळे डोळस माणसांप्रमाणेच आम्ही वावरतोय असे प्रतिपादन अंध दिव्यांग बांधव रामदास बाबासाहेब कडलग यांनी केले.
पोखरी हवेली येथे 3 डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कडलग यांनी दिव्यांग बांधव वापरत असलेल्या साहित्य साधनांची माहिती विदयार्थ्याना दिली. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त कडलग यांचा यथोचित सन्मान शाळेच्यावतीने करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक एकनाथ साबळे यांचाही सन्मान करण्यात आला.
शाळेतील विशेष शैक्षणिक गरजधारक विदयार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य संदेश कडलग, पदवीधर शिक्षक शिवाजी नरवडे, दस्तगीर शेख, शकुंतला शेळके, सखाराम पाटील, सोनाली बागुल, राजेंद्र सूर्यवंशी, जयराम गवांदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ मदने यांनी केले.