मतदानकेंद्रांवर पाळणाघर व आरोग्य कक्ष

अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविकांना प्रशिक्षण

प्रतिनिधी —

नेवासा तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर पाळणाघर व आरोग्य कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या कामासाठी नियुक्ती करण्यात येणाऱ्या अंगणवाडी सेविका व आशासेविकांचे प्रशिक्षण घेण्यात आले.

नेवासा तहसील कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक नायब‌ तहसीलदार किशोर सानप यांनी या प्रशिक्षण सत्रास मार्गदर्शन केले.

महिला मतदारांसोबत आलेल्या लहान मुलांची काळजी घेण्याकरिता प्रत्येक मतदान केंद्रावर पाळणाघराची व्यवस्था केली जाणार आहे. या ठिकाणी प्रशिक्षित सहायक म्हणून अंगणवाडी सेविकांची नेमणूक केली जाणार आहे.

मतदान केंद्रावर आरोग्य कक्ष 

आरोग्य कक्षातील सुविधेतील मेडिकल किटमध्ये वेदनाशामक औषध, बॅण्डेज, ओआरएस पावडर, जखमेवर लावण्यासाठी पट्टी आदी साहित्याबरोबरच प्रत्येक मतदान केंद्रावर एक वैद्यकीय सहायक म्हणून आशा स्वयंसेविकाची नेमणूक केली जाणार आहे, असे सानप यांनी सांगितले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!