आदिवासी विकास विभागातील आश्रम शाळा आणि वसतिगृहातील नियमबाह्य प्रतनियुक्त्या रद्द !

आयुक्त नयना गुंडे यांचे आदेश 

प्रतिनिधी —

आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रम शाळा व वसतिगृह येथे कार्यरत असणाऱ्या आणि शैक्षणिक कामकाजाशी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची पदे रिक्त ठेवून अन्य कार्यालयात बिगर शैक्षणिक पदांवर प्रतिनियुक्ती करण्यात येऊ नये आणि ज्यांच्या प्रतिनियुक्त्या करण्यात आल्या आहेत अशा प्रतिनियुकत्या रद्द करण्यात येत असून सण 2023 पर्यंतच्या वर्ग 3 व वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांच्या आयुक्तालय स्तरावरून प्रतिनियुक्त्या करण्यात आल्या आहेत आणि ज्यांच्या कालावधी पूर्ण झाला आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ आपल्या मूळ आस्थापनेवर हजर करण्यासाठी कार्यमुक्त करण्यात यावे असे आदेश आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त (नाशिक) नयना गुंडे यांनी सर्व विभागांना दिले आहेत.

आदिवासी विकास नाशिक विभागासह ठाणे, अमरावती, नागपूर विभागातील आदिवासी विभाग प्रकल्प कार्यालय आणि आश्रम शाळां, वसतिगृहांमध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या करताना नियमबाह्यपणा आणि मर्जीनुसार केल्याने शाळेतील शैक्षणिक वातावरणावर विपरीत परिणाम होत असल्याचे समोर आल्यानंतर आदिवासी विकास विभागाच्या नाशिक येथील आयुक्त यांनी तातडीने हे आदेश दिले आहेत.

आयुक्तांनी वृत्ताची तातडीने दखल घेत 29 ऑक्टोबर 2024 रोजी हा आदेश दिला असून नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर, विभागाचे तसेच प्रकल्प अधिकारी, एकात्मिक विकास प्रकल्प या सर्वांना हे आदेश देण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे अपर आयुक्त व प्रकल्प कार्यालयातील कार्यालयांनी अशा नियुक्त्या करताना आयुक्तालयाची कुठलीही परवानगी न घेता आश्रम शाळेमधील प्राथमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक, प्राथमिक माध्यमिक मुख्याध्यापक व वसतीगृहाचे कर्मचारी कामकाजासाठी कार्यालयात घेतले आहेत. ही अतिशय गंभीर स्वरूपाची बाब आहे. त्यामुळे ज्या कार्यालयांनी अशा प्रकारच्या सेवा आपल्या कार्यालयात कामकाजासाठी घेतलेल्या असतील त्या कार्यालयाने तात्काळ संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ आस्थापनेवर पाठवावे. यासंदर्भात भविष्यात काही अडचणी उदभवल्यास आपण व आपले कार्यालय त्या जबाबदार राहील असा इशाराही या आदेशात देण्यात आला आहे.

तसेच ज्या कार्यालयाला कामकाजाची निकड आहे ते लक्षात घेता जो कर्मचारी कामकाजासाठी पाहिजे असेल अशा कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव आयुक्तालयास आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह सादर करावा असेही आदेशात म्हटले आहे.

राज्यातील अनेक आश्रम शाळांमध्ये कर्मचारी प्रतिनियुक्त केले जात आहेत. या नियुक्त्या करताना नियमबाह्यपणे आणि वशिलेबाजीने केल्या जात आहेत असा आरोप केला जात आहे. प्रति नियुक्ती केलेले कर्मचारी त्या जागेवर अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेले आहेत. त्यामुळे शाळेतील शैक्षणिक वातावरणावर विपरीत परिणाम होत आहे. शाळेचा निकाल कमी लागत आहे. शिक्षकच प्रतिनियुक्तीवर गेल्यामुळे शिक्षणाचे काम सोडून भलतेच काम सुरू असल्याने शाळांच्या निकालावर परिणाम होत असल्याचे इतर शिक्षक सांगतात.

शाळांच्या निकालांवर परिणाम झाल्यामुळे मुख्याध्यापकांच्या वेतन वाढी कमी केल्या जात आहेत. विशेष म्हणजे वर्ग चार चे कर्मचारी, स्वयंपाकी, कामठी, शिपाई यांना त्यांच्या मर्जीनुसार प्रकल्प कार्यालयात प्रतिनियुक्त्या दिल्या जात आहेत. आयुक्त कार्यालयाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता हे राजरोसपणे चालू आहे. गेल्या 14 वर्षांपासून सहाय्यक प्रकल्प अधिकारी पदे तात्पुरती शिक्षकातून भरून ते शिक्षक शाळेतील अध्यापन सोडून प्रकल्प कार्यालयात कामे करीत मुख्याध्यापकांचे साहेब होऊन बसले आहे.

या प्रतिनियुक्त्यांमुळे आश्रम शाळा वसतिगृहातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी होत आहे. या सर्व प्रकारास शासकीय अधिकारी जबाबदार आहेत. आदिवासी पालक वर्ग आणि काही शिक्षक, मुख्याध्यापक अशामुळे उद्योगामुळे हतबल झाले असून शिक्षक शिक्षणाचे काम सोडून प्रकल्प कार्यालयात जाऊन बसले आहेत. शिपाई, स्वयंपाकी हे सुद्धा त्यांचे काम सोडून प्रति नियुक्त्यांवर भलत्याच जागेवर काम करत असल्याचे आढळून आले आहे.

आदिवासी विकास विभागाअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या आणि सध्या प्राप्त माहितीनुसार प्रतिनियुक्ती अनेक ठिकाणी झालेल्या आहेत. कोणतीही प्रतिनियुक्ती करायची असल्यास त्याबाबत आयुक्तांना प्रस्ताव सादर करावा लागतो आणि आयुक्तांच्या मंजुरीनंतर प्रतिनियुक्ती करता येते. या नियमाचे शंभर टक्के पालन केले जात नाही. त्याचा फायदा प्रकल्प कार्यालयातील अधिकारी घेतात व आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांना शिक्षकांना त्यामुळे आश्रम शाळांमध्ये मर्जीप्रमाणे नियुक्ती दिल्याने शिक्षक कामावर दिसून येत नाहीत. विशेष म्हणजे ही प्रतिनियुक्ती फक्त ठराविक कालावधी साठी असते मात्र काही ठिकाणी दहा ते पंधरा वर्षापर्यंत त्याच पदावर प्रति नियुक्ती झालेल्या कर्मचारी, शिक्षक चिकटून बसलेले आहेत.

Oplus_131072

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!