देशात आणि राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणाऱ्या विचारांचे सरकार सत्तेवर — आमदार बाळासाहेब थोरात 

कोळवाडे येथे गांधी जयंती निमित्त आदिवासी मेळावा

प्रतिनिधी —

सध्याचे भाजप आघाडी सरकार बहुजनांच्या आणि आदिवासींच्या विरोधात आहे. मणिपूर मध्ये आदिवासी महिलांवर अत्याचार झाले. मणिपूर पेटते आहे, अशावेळी पंतप्रधानांना मणिपूरमध्ये भेट देण्यासाठी वेळ नाही. तर मोठी जाहिरात बाजी करून उभारलेले राम मंदिर व नवीन संसद भवन यांच्या उद्घाटनासाठी देशाच्या महामहीम राष्ट्रपतींना बोलवले नाही यावरून हे सरकार कोणत्या विचारांचे आहे हे लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणाऱ्या विचारांचे सरकार सत्तेवर आहे. सरकारच्या घोषणा फक्त निवडणुकीपुरते आहेत. यांच्या कोणत्याही घोषणांना फसू नका यांना बहीण लाडकी नसून सत्ता लाडकी असल्याची धनाघाती टीका त्यांनी केली.

देशाच्या सर्वोच्च पदावर आदिवासी महिला बसावी हे राष्ट्रपिता महात्मा गांधींचे स्वप्न होते. याकरता काँग्रेसने वंचित बहुजन आदिवासींच्या विकासासाठी कायम काम केले. मात्र मणिपूर मधील आदिवासी महिलांवर अत्याचार , राम मंदिर व नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला महामहिम राष्ट्रपती महोदयांना न बोलवणे या विचारांचे लोक सत्तेवर असून सध्याचे केंद्र व राज्य सरकार हे आदिवासी, गरीब आणि बहुजन यांच्या विकासाच्या विरोधी सरकार असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली असून आदिवासी व सर्वसामान्यांच्या विकासासाठी काँग्रेसच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन त्यांनी केले आहे.

कोळवाडे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती व जयहिंद आदिवासी आश्रम शाळेच्या 30 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित आदिवासी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ.सुधीर तांबे होते. तर दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष लकी जाधव, रणजीतसिंह देशमुख, सुधाकर जोशी, अजय फटांगरे, विष्णुपंत रहाटळ, संपतराव डोंगरे, राजेंद्र चकोर, सिताराम वर्पे, अर्चना बालोडे ,प्रा. बाबा खरात, पुनम माळी, काशिनाथ गोंदे, मुख्याध्यापक दशरथ वर्पे, सरपंच पुष्पा गुंजाळ, बाबुराव गोंदे, सोपान वर्पे, आदींसह परिसरातील पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्थापन केलेल्या या आदिवासी आश्रम शाळेने राज्यात गुणवत्तेने कायम प्रथम क्रमांक मिळवला असून या शाळेमुळे अनेक कुटुंबांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये मोठी गुणवत्ता असून त्यांना संधी मिळाली तर ते अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात. या परिसराने कायम आपल्यावर प्रेम केले असून या गावच्या विकासासाठी सातत्याने अनेक योजना राबवल्या आहेत.

आदिवासी बांधवांसाठी सोनिया गांधी यांच्या पुढाकारातून 2006 मध्ये वन जमिनी बाबतचा कायदा झाला आणि आपण महसूल मंत्री असताना आदिवासींची नावे त्या उताऱ्यावर आली. काँग्रेसने कायम आदिवासी व गोरगरिबांच्या विकासाचे काम केले असून

डॉ. तांबे म्हणाले की, वंचित आदिवासी व बहुजन समाजाला राज्यघटनेमुळे मताचा अधिकार मिळाला आहे. ही राज्यघटना आणि स्वातंत्र्य महात्मा गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले आहे. गांधींचा मानवतावादी विचार जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करा असे आवाहन केले.

लकी जाधव म्हणाले की, आदिवासींच्या विकासाच्या योजनेचा निधी हा लाडक्या बहिणीसाठी वापरला जात आहे हे सरकार आपले सर्व अधिकार काढून घेत असून सर्वांनी येत्या काळात महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन केले.

डॉ. थोरात म्हणाल्या की, आदिवासी हे मूळ देशाचे मालक आहे. स्त्रियांना मान देणारा पर्यावरणाचा रक्षण करणारा जीवनात जगण्यासाठी रोज संघर्ष करणारा आदिवासी बांधव असून हे सर्व प्रामाणिक व कष्टकरी असतात शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाह आणण्यासाठी आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले जात असल्याचे त्या म्हणाल्या.

यावेळी संपतराव कडू, नवले मामा, कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, दशरथ गायकवाड, श्रीराम कुऱ्हे, मधुकर गोंदे, श्रीपत कुदळ, लहानु काळे, दत्तू तारडे, रामा मडके, राजू कवटे, दिलीप बांबळे, अण्णा रहिंज, बाळकृष्ण गांडाळ, संदीप गोपाळे आदींसह परिसरातील कार्यकर्ते व आदिवासी नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दशरथ वर्पे यांनी केले. सूत्रसंचालन अविनाश दिघे व नामदेव कहांडळ यांनी केले तर प्रा. बाबा खरात यांनी आभार मानले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!