महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्यांची वृत्ती आणि राहुल गांधींची जीभ कापण्यासाठी बक्षीस जाहीर करणाऱ्याची वृत्ती एकच आहे — काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात

प्रतिनिधी —

महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्यांची वृत्ती आणि राहुल गांधींची जीभ कापण्यासाठी बक्षीस जाहीर करणाऱ्याची वृत्ती एकच आहे असे ट्विट काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी समाज माध्यमातून केल्याने या ट्वीटची एकच चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधींना मारण्याची धमकी दिल्याने त्यांचा आवाज बंद होणार नाही. राहुल गांधींनी आजवर कायम संविधान रक्षणाची भूमिका घेतली आहे.

ते जे बोललेच नाही ते त्यांच्या तोंडी घालून त्यांना बदनाम करण्याचे जे षडयंत्र सुरू आहे, ते कधीही यशस्वी होणार नाही.

राहुल गांधींच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणात नाही, काँग्रेसचे कोट्यवधी कार्यकर्ते राहुल गांधींची ढाल आहेत. महत्वाचे म्हणजे या देशातील सामान्य जनता राहुल गांधी यांच्या सोबत खंबीरपणे उभी आहे.

संजय गायकवाड या आमदाराच्या बेताल वक्तव्याचा आम्ही निषेध करतो आणि राज्यात जर कायद्याचे थोडे बहुत राज्य शिल्लक असेल तर तातडीने संजय गायकवाडच्या मुसक्या आवळून, राज्यसरकारने अशा विषवल्लीला मुळापासून उखडून फेकले पाहिजे. असे आमदार थोरात यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!