महिनाभराच्या आतच संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांची बदली…
कुणाल सोनवणे नवे डीवायएसपी
प्रतिनिधी —
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलात पुन्हा एकदा बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वीच अहमदनगरच्या पोलीस मुख्यालयातून संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक पदभार घेतलेल्या हरीश दत्तात्रय खेडकर यांची नाशिकला बदली झाली असून त्यांच्या जागेवर कुणाल शंकर सोनवणे यांची शासनाने बदली केली आहे.

खेडकर आणि सोनवणे यांच्यासह राज्यातील बारा पोलीस उपाधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. गेल्या काही दिवसांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या कुणाल सोनवणे यांची संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर तत्कालीन पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची बढतीवर दौंडला बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर संगमनेरचा पदभार हरीश खेडकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

मात्र मंगळवारी निघालेल्या बदलांच्या आदेशात खेडकर यांची बदली नाशिक ग्रामीण मध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून करण्यात आली आहे.
याशिवाय अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्या अशा (कंसात नव्या नियुक्तीचे ठिकाण)…
राजेश चंदेल, अप्पर पोलीस अधीक्षक पुणे (उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव उपविभाग)
भागवत फुंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर उपविभाग (उपविभागीय पोलीस अधिकारी वैजापूर उपविभाग)
नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या पोलीस उपाधीक्षक सविता गर्जे (उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीवर्धन उपविभाग)
हरीश खेडकर, पोलीस उपाधीक्षक मुख्यालय अहमदनगर -संगमनेर उपविभाग (पोलीस उपाधीक्षक नाशिक ग्रामीण)
नियुक्तीच्या प्रतीक्षात असलेले पोलीस उपाधीक्षक शैलेश काळे (सहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे शहर)
गजानन पडघन, सहाय्यक पोलीस आयुक्त अमरावती शहर (उपविभागीय पोलिस अधिकारी बाळापुर उपविभाग)
अनिल पवार अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत विभाग अमरावती (उपविभागीय पोलीस अधिकारी चांदूर रेल्वे उपविभाग)
नियुक्तीच्या प्रतीक्षात असलेले पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे (पोलीस उपाधीक्षक संगमनेर उपविभाग)
नियुक्तीच्या प्रतीक्षा असलेले पोलीस उपाधीक्षक राजा पवार (अप्पर पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग नागपूर)
अनुराधा उदमले, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहर (सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर)
सुनील तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर (पोलीस उपाधीक्षक सुधार सेवा पुणे)
बाळकृष्ण हनपूटे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी बिलोली उपविभाग (उपविभागीय पोलीस अधिकारी आष्टी उपविभाग)
