लाडक्या बहिणींना पैसे नको, सुरक्षा द्या !
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ संगमनेर शिवसेनेचे आंदोलन
प्रतिनिधी —
बदलापूर येथील अत्याचार प्रकरणाचा राज्यभर निषेध सुरू असताना संगमनेरमध्ये देखील शिवसेना आणि शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने रस्त्यावर उतरून ‘लाडक्या बहिणींना पैसे नको, सुरक्षा द्या’, अशा घोषणा देत राज्याच्या गृह खात्याचा निषेध केला.
महिला संपर्कप्रमुख बेबीताई लांडगे, विधानसभा संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांच्या आदेशावरून संगमनेरमध्ये बुधवारी हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांनी यावेळी बदलापूर अमानवीय घटनेचा निषेध करत नराधम आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. तसेच पीडितांना न्याय देण्यास विलंब करणाऱ्या गृह खात्याचा घोषणा देत धिक्कार करण्यात आला. राज्याच्या गृहमंत्री पदावर कार्यरत असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ सपशेल अपयशी ठरला असल्याचा आरोप करत आंदोलकांनी कोपर्डी प्रकरण, नवी मुंबई प्रकरण, बदलापूर प्रकरण आणि राज्यातील विविध अमानवीय घटनांचा उल्लेख केला. बदलापूर प्रकरणी पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली तक्रार नोंदवून घेण्यास दिरंगाई केली? संबंधित संस्थाचालक कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे? बदलापूर प्रकरणी आंदोलनासाठी रस्त्यावर आलेल्या आंदोलकांवर पोलिसांमार्फत लाठी चार्ज का करण्यात आला? असे अनेक प्रश्न आंदोलकांनी यावेळी उपस्थित केले.

बदलापूर घटनेसह राज्यात घडत असलेल्या अमानवीय प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात सातत्याने राजकीय दबाव जाणवत आहे. तसेच यासंदर्भात पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद ठरत असल्याने गृह खात्याचे प्रमुख असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणी शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी केली आहे.
महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख शितल हासे, उपजिल्हाप्रमुख आशा केदारी, शहर प्रमुख संगीता गायकवाड, उप तालुका प्रमुख रेणुका शिंदे, वैशाली वडतल्ले आदी महिला पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपल्या मागणीचे निवेदन पोलिसांना दिले.

यावेळी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, भाऊसाहेब हासे, गोविंद नागरे, फैसल सय्यद, पथ विक्रेता समितीचे सदस्य दीपक साळुंखे, आरोग्य सेनेचे जिल्हाप्रमुख अजीज मोमीन (मुस्लिम मावळा), वैभव अभंग, वेणुगोपाल लाहोटी, दीपक वनम, अक्षय बिल्लाडे, अमोल डुकरे, भाई शेख, प्रकाश गायकवाड, शरद कवडे, आसिफ तांबोळी, निलेश गुंजाळ, अक्षय गाडे, अल्ताफ शेख, इमरान सय्यद, इरफान सय्यद, प्रशांत खजुरे, अनिल खुळे, त्रिलोक कतारी, संकेत घोडेकर, रोमन सय्यद, नारायण पवार, प्रकाश चोथवे, माया राठोड, वर्षा मंडलिक, रंजना पवार, सुगरिता खीची, काजल राठोड, भाऊसाहेब बोराडे, सदाशिव हासे, विलास शेळके आदी शिवसैनिक उपस्थित होते.
