संगमनेरच्या श्रीकृष्ण मंदिर जीर्णोद्धाराचे भूमिपूजन !
तमाम श्रीकृष्ण भक्तांना उपस्थित राहण्याचे तिळवण तेली समाजाचे आवाहन…
प्रतिनिधी —
पारंपारिक पद्धतीने घाण्यापासून तेलाची निर्मिती करून शुद्ध तेल आणि किराणा व्यवसायावर आपली उपजीविका साधणाऱ्या संगमनेरच्या तेली समाजाने आपले धार्मिक कर्तव्य पार पाडत संगमनेर येथील मेन रोडवरील श्रीकृष्ण मंदिराच्या जिर्णोद्धाराचा कार्यक्रम हाती घेतला आहे. हे मंदिर सर्व संगमनेरकरांसाठी श्रद्धेचे ठिकाण असून अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा जीर्णोद्धार व्हावा अशी इच्छा तेली समाज बांधवांची आणि तमाम श्रीकृष्ण भक्तांची आहे आणि ती पूर्ण होईल असा विश्वास त्यांना वाटतो.

१ मे १९१४ साली संगमनेर शहरातील मेनरोड येथील त्या काळी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे पहिले विश्वस्त कै. कोडांजी तेली, कै. बापू नाना, कै. दावल भवानी, कै. भिका हरी, कै. दगडू खंडू यानी सुदंर असे भगवान श्रीकृष्ण मंदिर बांधकाम केले. व समाजापुभढे एक आदर्श ठेवला.

पुढील काळात अमृतराव कर्पे, महादू कर्पे, श्रीपत वालझाडे, किसनराव कर्पे, किसनराव भोत, शंकर गंगाराम कर्पे, बबनराव व्यवहारे, पुजींराम वालझाडे, बाबुराव कर्पे, दत्तात्रय वालझाडे, सखाहरी वालझाडे, गंगाधर कर्पे, मारुतराव भोत यांनी समाजाचे कार्य पुढे चालू ठेवले. नंतर विश्वस्त म्हणुन कै. बाबुराव महादु कर्पे यानी सलग ३५ वर्षे समाजाचे अध्यक्षपद भूषविले. व पुढे यांनी चाळीस वर्ष मंदीरांचा कारभार बघीतला… कै.बाबुराव कर्पे, कै.सोमनाथ रेवजी वालझाडे, ब्रम्हदेव दगडू वालझाडे, माधवराव कर्डिले सर, दिलिप कचरू आंबेकर यांनी कामकाज बघुन समाजातील दोन जागाचे आरसीसी बांधकाम करून भव्य इमारती उभ्या करून आपले कर्तव्य पार पाडले. आणि एक जागा न्यायालयाच्या माध्यमातून समाजास मिळवून दिली. ती जागा आज पण न्याय प्रविष्ठ आहे.

त्याकाळात बाबूराव हातेकर, हभप बाळकृष्ण कर्पे महाराज, उत्तमराव चिमणराव कर्पे, तुळशीराम कर्डिले, बाळाजी कर्पे, विश्वनाथ वालझाडे, बाबुराव महाले, गणपत पवार, हरिभाऊ दिवटे, हरिभाऊ वालझाडे, विष्णू शिन्दें, दत्तात्रय शिन्दे, कचरूशेठ आंबेकर, सखाहरी वालझाडे, लक्ष्मणराव कर्पे, ऊत्तमराव कर्पे, सुर्यभान दिवटे, रमेश बाबुराव कर्पे, दशरथ आबाजी क्षीरसागर, कै.रामनाथ पन्हाळे, कै.हरीभाऊ पन्हाळे, दामोधर पाबळकर, रामनाथ पाबळकर, पंढरीनाथ दुर्गुडे, वाकचौरे, सुर्यभान रहातेकर दिनकरराव शेलार, नानासाहेब भोत, शातांराम वालझाडे, छगनराव कर्पे, रामनाथ दुर्गुडे, रामकृष्ण दुर्गुडे, किसनराव वालझाडे, भोलाणे प्रभाकर, रामचंद्रं बनसोडे, बाळकृष्ण कर्पे, विठ्ठलराव दिवटे, नारायण पेंटर, गणपत कर्डिले, चद्रंभान दिवटे, भानुशेठ दिवटे, बारकु धामणे, अबाजी सखाराम क्षीरसागर, शंकरराव पन्हाळे, माधवराव कर्पे, रामनाथ वालझाडे, गुलाबराव वालझाडे, मारुतराव क्षीरसागर, अबांदास भागवत, लक्ष्मणराव रहातेकर, विष्णूपंत वालझाडे, भोत मेहतर, वाकचौरे मेहतर, सुदामराव वालझाडे, गोविंद वालझाडे, मेहतर या व ईतर अनेक जेष्ठ समाजबाधंवानी सहकार्य केले.

मंदिरास जवळपास १११ वर्षे पुर्ण होत आहेत. संगमनेर शहरात अनेक समाजानी आपआपल्या मंदिराचा जिर्णोद्धार केलेला आहे. यामुळे धार्मिक भावना वाढते, सामाजिक एकोपा निर्माण होतो. मंदिर म्हणजे केवळ दर्शन नव्हे तर ते एक शक्तीस्थळ असते. प्रेरणा देणारी भगंवताची वास्तू असते. हि भावना भावी पिढीस सुध्दा समजावी ही ईच्छा ठेवून जिर्ण झालेले जूने मदिरं नविन करण्यात येत आहे.

संगमनेर शहरात भगवान श्रीकृष्णाचे हे केवळ एकच जागृत असे मंदिर आहे. भक्ताची हाक ऐकणारा श्रीकृष्ण भगवान आहे याची प्रचिती अनेकानां आलेली आहे. मंदिरात भगवान श्रीकृष्ण याची मुर्ती आहे. मंदिरातील सुदंर मुर्ती आजही जशी आहे तशीच आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहाने पार पडतो. यावेळेस शहरातील भाविक दर्शनाचा लाभ घेतात. अशा या तेली समाजाच्या श्रीकृष्ण मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या भुमिपुजनाचा कार्यक्रम बुधवार 21 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी १ वाजता भागवताचार्य प.पुज्य गोवत्स राधाकृष्णजी महाराज व समाजातील जेष्ठ नागरीकाच्यां उपस्थितीत मेनरोड, संगमनेर येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास संगमनेर शहरातील सर्व श्रीकृष्ण भक्तानीं उपस्थित रहावे अशी विनंती तिळवण तेली समाज श्रीकृष्ण मंदिर जिर्णोद्धार समितीच्य वतीने करण्यात आली आहे.
लेखक – समाज बांधव, तिळवण तेली समाज संगमनेर यांच्या वतीने हा लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे..
