अकोले नगरपंचायत ;
नगराध्यक्ष मिळणार सर्वसाधारण गटातून…
बाळासाहेब वडजे यांना संधी मिळण्याची शक्यता
अलताफ शेख —
आज मंत्रालयात राज्यातील १३५ नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत काढण्यात आली यामध्ये नुकतीच निवडणूक पार पडलेल्या अकोले नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे सर्वसाधारण (जनरल ) आरक्षण निघाले आहे.

अकोले नगरपंचायतीची निवडणूक नुकतीच होऊन १२ जागा जिंकत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. यामुळे भाजपाचीच सत्ता नगरपंचायत वर आली आहे.
अनुसूचित जाती राखीव प्रभागात राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या श्वेताली मिलिंद रुपवते (घोलप) या एकमेव उमेदवार विजयी झाल्याने सर्वपक्षीयासह तालुक्याचे लक्ष नगराध्यक्षपद आरक्षणाकडे लागले होते.
आज गुरूवारी दुपारी ४ वा मंत्रालय मुंबई येथे राज्यातील १३५ नगरपंचायत नगराध्यक्ष पद आरक्षण सोडत काढण्यात आली.
कोविड प्रादुर्भाव सुरु असल्याने या सोडतीचे दूरदृष्यप्रणाली (V C ) द्वारे विभागीय आयुक्तालयात आयोजित केले होते. यावेळी चिठ्ठी द्वारे काढण्यात आलेल्या आरक्षणात अकोले नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण (जनरल) निघाले आहे.

नगराध्यक्ष भाजपाचाच होणार हे निश्चित झाले असुन यापदासाठी भाजपामधुन बाळासाहेब वडजे, नगरसेविका सोनाली नाईकवाडी, प्रतिभा मनकर या इच्छुकांमध्ये रस्सीखेच आहे. मात्र माजी मंत्री मधुकर पिचड,माजी आमदार वैभव पिचड हे कोणत्या नावाला पसंती देतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
असे असले तरी बाळासाहेब वडजे यांची वर्गणी नगराध्यक्षपदी लागण्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
