निवडणुकीनंतर राजकीय वाद विसरून विकासाची कामे करावीत ;   

माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे

नगरसेविका शीतल वैद्य यांचा गावाच्या वतीने सत्कार

प्रतिनिधी –

कोणत्याही पक्षातून निवडणूक लढा, मात्र निवडणुकीनंतर गावाच्या विकासासाठी कोणताही वाद न घालता सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन शिर्डी लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले.

सुगाव खुर्द च्या स्नुषा शितल अमोल वैद्य या अकोले नगरपंचायत निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल सुगाव खुर्द गावच्या वतीने त्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे बोलत होते. अध्यक्षस्थानी अगस्ती देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त ह भ.प.दीपक महाराज देशमुख होते.

यावेळी माजी सरपंच विष्णूपंत वैद्य, संतोष देशमुख , सरपंच शुभांगी वैद्य, उद्योजक भारत पिंगळे, विद्याचंद्र सातपुते, संदीप दातखिळे, पत्रकार अमोल वैद्य, सामाजिक कार्यकर्ते दीपक वैद्य, मनोहरपुर च्या सरपंच पद्मा भांगरे, जनलक्ष्मी पतसंस्थेचे संचालक सुभाष वैद्य, सचिन वैद्य, सुगाव सोसायटीचे चेअरमन एकनाथ वैद्य, बाळासाहेब वैद्य, दयानंद वैद्य, शांताराम वैद्य, सतिष वैद्य, लक्ष्मण वैद्य, केशव भांगरे, सतीश वैद्य, सुनील पवार, इंदूबाई जाधव, कचरू गोर्डे, महेंद्र भांगरे, संजय वैद्य, मधुकर पवार, दादाभाऊ पवार, दामोदर वैद्य, सूर्यभान वैद्य, बाळासाहेब गुळवे, निवृत्ती वैद्य, रामनाथ पवार, शिवनाथ मदने, हौशीराम रोहम, बाळासाहेब दुटे, चंद्रकांत पवार, बाळू वैद्य, सुरेश पवार, विजय पवार, दिनकर वैद्य, किशोर वैद्य, भूषण वैद्य, सागर वैद्य, अक्षय वैद्य, जय वैद्य आदींसह नागरिक, महिला व तरुण मोठया उपस्थित होते.

वाकचौरे पुढे म्हणाले की, शितल वैद्य ह्या अकोले नगरपंचायत मध्ये नगरसेविका म्हनुन मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या.त् यांचा सत्कार गावच्या वतीने होतो ही बाब कौतुकास्पद आहे. शितल या उच्च शिक्षित असल्याने व शिक्षिका असल्याने त्या निश्चित चांगले काम करून आपल्या कामाचा ठसा उमटवतील यात शंका नाही.

ह.भ.प.दीपक महाराज देशमुख म्हणाले की, मुलीचा सत्कार तर सगळेच करतात, मात्र सुनेचा सत्कार आज गावच्या वतीने होतो ही बाब कौतूकास्पद आहे. आपली संस्कृती जपल्याचे ते लक्षण आहे. कोणी कितीही विरोध केला तरी आपल्या कामातून आपले कर्तृत्व शितल वैद्य सिद्ध करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अमोल वैद्य यांनी आपला जीवनप्रवास सांगताना गावासाठी केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. तसेच माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड, जि. प.सदस्य कैलास वाकचौरे यांनी आपल्यावर विश्वास टाकून आम्हाला नगरसेवक होण्याची संधी दिली. त्यांच्या सहकार्याने अकोले नगरपंचायत मध्ये चांगले काम करणार असल्याचे स्पष्ट केले.


सत्काराला उत्तर देताना निर्वाचित नगरसेविका शितल वैद्य म्हणाल्या की, माझ्या विजयात सुगाव खुर्द च्या सर्व ग्रामस्थांचा मोलाचे योगदान आहे. मला कधीही सून म्हणून न वागविता एका मुलीप्रमाणे प्रेम दिले. मात्र काहींनी निवडणूकित त्रास दिला या बद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. भाजपच्या सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून माझ्या विजयात मोलाचे योगदान दिले त्या सर्वांच्या ऋणात राहिल.

यावेळी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव नेहे, सामाजिक कार्यकर्ते दीपक वैद्य, अनिल वैद्य यांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक माजी सरपंच एकनाथराव वैद्य यांनी केले, सूत्रसंचालन शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष लक्ष्मण वैद्य यांनी करून शेवटी आभार मानले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!