संगमनेरातील व्यापाऱ्याला एक वर्ष सक्तमजुरी आणि चार लाखाचा दंड

पतसंस्थेची केली फसवणूक 

प्रतिनिधी —

पतसंस्थेला थकबाकी पोटी दिलेला चेक न वटल्याने संगमनेरातील व्यापारी रुपेश सुभाष वर्मा याला दोषी ठरवत १ वर्ष सक्तमजुरी आणि ४ लाख रुपये दंडाची शिक्षा दिवाणी व फौजदारी न्यायाधीश एम. जे. गायकवाड यांनी ठोठावली आहे.

संगमनेर बाजारपेठेमधील सुवर्णकार व्यापारी रुपेश सुभाष वर्मा याने राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या, संगमनेर या पतसंस्थेकडून कर्ज घेतले. ते थकीत झाल्यानंतर या आरोपीने पतसंस्थेस थकीत रक्कम देण्यापोटी २ लाख ४८ हजार ८० रुपयांचा चेक (धनादेश) पतसंस्थेस दिला. दिलेला चेक न वटता परत आल्यानंतर पतसंस्थेची फसवणूक केल्यासंबधी पतसंस्थेने संगमनेर न्यायालयात फिर्याद दाखल केली होती.

दिवाणी व फौजदारी न्यायाधीश एम. जे. गायकवाड यांचे समोर या खटल्याची सुनावणी झाली. फिर्यादी संस्थेचे वकील राजेश जे. भुतडा यांनी न्यायालया समोर पतसंस्थेची बाजू मांडत संस्थेतर्फे मॅनेजर गजाजन ठाकरे यांची महत्वपुर्ण साक्ष नोंदविली. फिर्यादी व आरोपीचे वकील यांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले. आरोपी रुपेश सुभाष वर्मा याला दोषी ठरविल्यानंतर पतसंस्थेस थकबाकी पोटी दिलेला चेक न वटल्याबाबत व पतसंस्थेची फसवणूक केल्याबाबत न्यायाधीश गायकवाड यांनी वरील शिक्षा सुनावली.

पतसंस्थेचे कायदेविषयक सल्लागार वकील राजेश जे. भुतडा यांनी बाजू मांडली व त्यांना वकील स्वप्नील एम. उपरे यांनी सहाय्य केले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!