कळसुबाई शिखरावर २७ वर्षांपासून उभारली जाते गुढी !

प्रतिनिधी —

शालीवाहन शकाचा आरंभ म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडवा सणाला होती. म्हणूनच आपल्या राज्यातील सर्वात सुंदर आणि आनंदाने गुढीपाडवा साजरा केला जातो.

घोटी शहरातील कळसुबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहक गेल्या २७ वर्षांपासून या सर्वोच्च शिखरावर गुढी उभारतात. यावर्षी देखील मंडळाच्या गिर्यारोहकांनी गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटेच सर्वोच्च शिखराची चढाई करून सूर्याच्या उगवत्या किरणांमध्ये कळसुबाई मंदिरावर गुढी उभारली.

नववर्ष सर्वांना सुखसमृद्धीचे, आरोग्यदायी जावो अशी प्रार्थना कळसुबाई चरणी करण्यातआली.  सर्वोच्च शिखरावर कळसुबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज, श्रीरामांच्या जयघोषात गुढी उभारण्यात आली. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले.

तसेच आपल्या लोकशाहीत मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. म्हणून प्रत्येकाने मतदान करावे अशी जनजागृती करण्याच्या उद्देशाने मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, ना जात पे ना धर्म पे, बटन दबेगा कर्म पे, वोट डालने जाना है अपना फर्ज निभाना हैं, मी मतदान करणारच अशा विविध घोषणा देऊन गिर्यारोहकांनी शिखर दणाणून टाकले.

मंडळाच्या गिर्यारोहकांनी शिखरावरून मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देऊन सामाजिक सलोखा जपला. सर्वोच्च शिखरावर असा उपक्रम राबवून कळसुबाई मित्र मंडळाने मराठी नववर्षाचे स्वागत करीत एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊन गुढीपाडवा सण अतिशय उत्साहात साजरा केला.

या उपक्रमात कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, काळू भोर, निलेश पवार, विकास जाधव, नितीन भागवत, सुधाकर तांबे, संजय शेवाळे, सुरेश चव्हाण, बाळू आरोटे, नामदेव जोशी, शरद महाले, भागीरथ म्हसणे, सोमनाथ भगत, रमेश हेमके, उमेश दिवाकर, जनार्दन शिंदे, पुष्कर पवार, जान्हवी भोर, सौरभ जाधव, सागर गव्हाणे, उत्तम बऱ्हे तसेच इतर गिर्यारोहक सहभागी झाले होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!