संगमनेरात भर दुपारी डॉक्टरचे सहा लाख रुपये पळवले !
प्रतिनिधी —
संगमनेर शहरात सुरू असलेल्या लहान मोठ्या चोऱ्यांचे सत्र थांबलेले नाही. बस स्थानकावर होणारी पाकीट मारी, सोनसाखळ्यांची चोरी, पर्सची चोरी यामधून अनेक तोळे सोने चोरीस गेले. मोटरसायकल चोरी देखील सातत्याने सुरूच आहे. अधून मधून घरफोड्या आणि जबरी चोरी देखील होत असते. शहरात शनिवारी दुपारी रहदारीच्या रस्त्यावरून स्कुटी गाडीच्या डिक्की ठेवलेले एका डॉक्टरचे सहा लाख रुपये चोरट्यांनी पळवून नेले आहेत.

संगमनेर शहरातील अत्यंत गजबजलेला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बस स्थानक ते बीड कॉलेज या मार्गावर त्रिमूर्ती जनरल स्टोअर च्या समोर ही घटना घडली आहे.
डॉक्टर राजेंद्र भाऊसाहेब मस्के (रा. पोफळे मळा, संगमनेर) हे काही कामानिमित्त त्रिमूर्ती जनरल स्टोअर समोर आले होते. त्यांच्या स्कुटी गाडीच्या डिक्कीत ठेवलेले ६ लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. या सदर्भात त्यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार टोपे हे करीत आहेत. शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

