संगमनेर अकोले तालुक्यातील सात सराईत गुन्हेगार तडीपार !

प्रतिनिधी —

संगमनेर अकोले तालुक्यातील सात सराईत गुन्हेगारांना वेगवेगळ्या शहरातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून वेगवेगळ्या कालावधीसाठी तडीपार करण्यात आले असल्याची माहिती संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.

अनिकेत गजानन मंडलिक (रा. माळीवाडा, संगमनेर) संपत उर्फ प्रशांत शांताराम गागरे (रा. कोळवाडे, तालुका संगमनेर) संजय अदालत नाथ शुक्ला (रा. राजुर, तालुका अकोले) वरद लक्ष्मण लोहकरे (रा. जनता नगर, संगमनेर) लाल्या उर्फ अल्ताफ शेख (रा. कुरण, तालुका संगमनेर) सचिन म्हस्कुले (रा. धांदरफळ, तालुका संगमनेर) अतुल कोल्हे (रा. धांदरफळ, तालुका संगमनेर) या ७ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

या सराईत गुन्हेगारांवर घरपोडी करणे चोरी करणे एटीएम मशीन फोडणे बेकायदेशीर जमा जमविणे ठार मारण्याचा प्रयत्न करणे जाळपोळ करणे मारहाण करणे विनापरवाना दारू बाळगणे दारूची विक्री करणे जातीवाचक शिवीगाळ करणे दमदाटी शिवीगाळ मोटार सायकल चोरी गाड्या पेटवणे वाहने जाळणे विनयभंग करणे असे विविध प्रकारचे अनेक गुन्हे दाखल असल्याने त्यांच्या तडीपारचे प्रस्ताव वरिष्ठांना पाठविण्यात आले होते. हे सर्व प्रस्ताव मंजूर करून कारवाई करण्यात आली आहे.

हद्दपारीची कारवाई पुढीलप्रमाणे —

अनिकेत गजानन मंडलिक याला अहमदनगर जिल्हा, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून ६ महिन्यांकरिता हद्दपार करण्यात आले आहे.

संपत उर्फ प्रशांत शांताराम गागरे याला अहमदनगर जिल्हा, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून ६ महिन्यांकरता हद्दपार करण्यात आले आहे.

संजय अदालतनाथ शुक्ला याला अहमदनगर जिल्हा, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका व इगतपुरी तालुक्यातून ३ महिन्यांकरिता हद्दपार करण्यात आले आहे.

वरद लक्ष्मण लोहोकरे याला अहमदनगर जिल्हा, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून ६ महिन्यां करिता हद्दपार करण्यात आले आहे.

लाल्या उर्फ अल्ताफ शेख याला अहमदनगर जिल्हा, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून १ वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे.

सचिन म्हस्कुले याला अहमदनगर जिल्हा, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून ३ महिन्यांकरिता हद्दपार करण्यात आले आहे.

अतुल कोल्हे याला अहमदनगर जिल्हा, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून ६ महिन्यांकरिता हद्दपार करण्यात आले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!