संगमनेर शहरात सशस्त्र हल्ला..
कोयता – काठ्या आणि दगडांचा वापर करीत दोघांना जमावाची बेदम मारहाण !
प्रतिनिधी —
संगमनेर शहरात लागत असणाऱ्या उपनगरात सोमवारी मध्यरात्री जमावाने दोन जणांना शस्त्रांसह बेदम मारहाण केल्याने एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केले आहे. आज त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

जमावाच्या मारहाणीत हुसेन बाबामियां शेख हा गंभीर जखमी झाला आहे. (राहणार मालदाड रोड, तिरंगा चौक, संगमनेर) मालदाड रोडवरील तिरंगा चौकाजवळ असणाऱ्या लक्ष्मीनगरात ही घटना घडली.
या घटनेबाबत समजलेली माहिती अशी की, मित्राला भेटण्यासाठी गेला असता त्याला होत असलेली मारहाण पाहून त्याला वाचवण्यासाठी हुसेन शेख मदतीला गेला आणि भांडणांमध्ये मध्यस्थी करू लागल्याने जमलेल्या तरुणांच्या जमावाने त्यालाही मारण्यास सुरुवात केली. तसेच या बेदम मारहाणी त्याच्यावर कोयत्याने वार करीत काठ्या व दगडांनी जोरदार प्रहार करून त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीमुळे हुसेन शेख हा गंभीर जखमी झाला आहे.

संगमनेर शहर पोलिसांनी शेख याच्या जबाबानंतर गोटया उर्फ प्रशांत घेगडमल (रा. कासारवाडी) सनी चंद्रशेखर तरटे (रा. गोल्डन सिटी) अविनाश सोमनाथ मंडलिक (रा. ढोलेवाडी) प्रथमेश अशोक पावडे (रा. नवीन नगर रोड) सौरभ राजेंद्र फटांगरे (रा. इंदिरानगर) निलेश काथे, अविनाश काथे साहिल देव्हारे, ओम काथे, अरबाज पठाण ऋषी धिमते सर्वजण राहणार संगमनेर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील पाच आरोपींना पोलिसांनी पहाटेचे अटक केली आहे.

