गृहमंत्री राजीनामा द्या – छात्रभारतीचे मुख्यमंत्री यांना निवेदन
महाष्ट्राचा बिहार झाला आहे का ? ज्येष्ठ निखिल वागळे यांच्या वर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
प्रतिनिधी —
पुणे येथे निर्भय बनो चे निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, ॲड. असीम सरोदे यांच्यावर भाजपच्या गुंडांनी हल्ला करून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. सातत्याने होणाऱ्या अशा घटनांमुळे महाराष्ट्राचा बिहार झाला आहे काय असा प्रश्न पडतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून संबंधित गुंडांवर कठोर कारवाई करावी आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. अशी मागणी छात्रभारतीच्या वतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन संगमनेर येथील प्रांत कार्यालयात त्यांनी दिले आहे.

निर्भय बनो ची सभा ही राष्ट्र सेवादल मध्यवर्ती कार्यलय या ठिकाणी पार पडणार होती. पुणे पोलिसांना माहीत असतानाही या मध्ये मोठी गाफीलता दिसून येत आहे. राज्य सरकार या मध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही. उलट गृहमंत्री या सर्व घटनेला खतपाणी घालताना दिसत आहेत. राज्य सरकार लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत आहे. सरकार गुंडांना पुढे करून लोकांना मारताना दिसत आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे.

महाराष्ट्र हे शिव – फुले, शाहू,आंबेडकर यांच्या विचारांचा पुरस्कार करणारे राज्य आहे. तरीही अश्या नथुरामी प्रवृत्ती बोकाळताना दिसत आहेत. .किमान या पुढे तरी राज्यात झुंडशाही बोकाळू नये म्हणून अकार्यक्षम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी छात्रभारतीने केली आहे.

राष्ट्र सेवादलाचे जिल्हा अध्यक्ष ॲड. समीर लामखडे, छात्रभारतीचे राज्य कार्यवाह अनिकेत घुले, गणेश जोंधळे, तुषार पानसरे, राहुल जऱ्हाड, मोहम्मद तांबोळी, श्रावणी गायकवाड, सुहानी गुंजाळ, सुयश गाडे, भारत सोनवणे, पूर्वा शिरसाठ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
