वरुडी पठार येथील ग्रामसेवकाची मनमानी !

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार

प्रतिनिधी —

वरुडी पठार येथील ग्रामसेवक भाऊसाहेब संपत भांड यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध गावच्या  उपसरपंच, माजी उपसरपंच व सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. निवेदनावर उपसरपंच कमल मोरे, माजी उपसरपंच सुरेखा फटांगरे, सदस्य सुदाम फटांगरे यांचे नावे व सह्या आहेत.

या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, वरुडी पठार गावचे ग्रामसेवक भाऊसाहेब संपत भांड यांचे राजापूर येथे दोन ते अडीच महिन्यापूर्वी प्रमोशनझालेले असुन त्यांच्या जागी अजित वसंत घुले यांची नियुक्ती गटविकास अधिकारी, संगमनेर यांचे आदेशाने झालेली आहे.

परंतू भांड यांनी घुले यांना चार्ज दिला नसल्याने २०२४ चा विकास आराखडा बनविता आला नाही. ग्रामपंचायतचे पाणी पुरवठयाचे बील भरणे बाकी असल्याने कोणत्याही क्षणी विज पुरवठा खंडीत होऊन नागरिकांना पाण्यापासुन वंचित राहावे लागेल. जिल्हा परिषदेने घणकचरा व्यवस्थापनासाठी निधी उपलब्ध करुन देऊनही भांड यांनी सदरचे काम केले नाही.

तसेच ढोरवाडी पाझर तलावातून बेकायदेशीर पाणी उपसा होत असल्याने उपसा बंद करणे गरजेचे होते. परंतू भांड यांनी चार्ज न दिल्याने प्रचंड प्रमाणात बेकायदेशीर पाणी उपसा झाल्याने नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागू शकते. गटविकास अधिकारी, संगमनेर यांचेकडे अनेकवेळा चकरा मारुनही आमची अडचण सुटली नाही. प्रत्येक वेळेस आम्हाला तुम्ही सर्व सदस्य, गावकरी, भांड व घुले एकत्र बसून निर्णय घ्या, तुमच्या गावात दोन गट आहेत. असे गटविकास अधिकारी यांनी सांगितले सांगितले.

वास्तविक गटविकास अधिकारी यांचा आदेश भांड यांनी पाळणे गरजेचे होते. परंतू त्यांनी प्रत्येक वेळी जिल्हा परिषद सेवा शर्ती, अटी, नियमांचा भंग केलेला आहे. अशाप्रकारे ग्रामपंचायतची सर्व विकास कामे ठप्प होणार आहेत. तसेच मासेमारीचा लिलाव गेल्या दोन वर्षांपासून झालेला नसल्याने ग्रामपंचायतचे प्रचंड नुकसान झालेले आहे व होणारही आहे. भांड यांनी संभाजीनगर हायकोर्टातून ढोरवाडी पाझर तलावा संदर्भात ग्रामस्थांनी दाखल केलेल्या दाव्याबाबत आलेले पत्र मासिक सभा किंवा ग्रामसभेमध्ये वाचून हायकोर्टात म्हणणे दाखल करणे गरजेचे होते. परंतू त्यांनी तसे केलेनाही. सारोळे पठार येथील दप्तरही त्यांनी संबंधित ग्रामसेविकेला दिलेले नाही. म्हणून त्यांची चौकशी होऊन तात्काळ बडतर्फ करण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!