खासगी विद्यापीठ विधेयकाची केली होळी !
छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे आंदोलन
प्रतिनिधी —
खासगी विद्यापीठाच्या विधेयकामुळे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे बंद होणार आहेत. शिक्षण प्रवाहातून त्यांना बाहेर पडावे लागेल. हे विधेयक रद्द करावे आणि याचा निषेध म्हणून राज्य शासनाने महाराष्ट्र विधिमंडळात पारित केलेल्या खासगी विद्यापीठ विधेयकाची छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने होळी करण्यात आली.

राज्य शासनाने महाराष्ट्र विधिमंडळात डिसेंबर मध्ये पारित केलेल्या खासगी विद्यापीठासंदर्भातील विधेयकामुळे गरीब विद्यार्थ्यांची दारे बंद होणार आहेत. या नव्या विद्यापीठाच्या महाविद्यालयात शिकणारे कोणतेही गरीब विद्यार्थी या पुढे फ्रिशिप किव्हा स्कॉलरशिप सारख्या सवलतीपासून वंचित राहणार आहेत.

ज्यांच्याकडे पैसा त्यानाच शिक्षणाची संधी भेटेल. ज्यांच्या कडे पैसा नाही त्या विद्यार्थ्यांना कितीही गुणवत्ता असली तरी त्यांना खासगी विद्यापीठात प्रवेश मिळणार नाही. विद्यपीठात प्रवेश घेता येणार नाही. यामुळे गरीब विद्यार्थी शिक्षणच्या प्रवाहातून बाहेर पडणार आहे. त्यांच्या शिक्षणावर गदा येणार आहे.

या अधिनियमान्वये स्थापन केलेले प्रत्येक विद्यापीठ हे स्वयं अर्थ सहाय्यीत असेल. विद्यापीठ शासनाकडून कोणत्याही स्वरूपाचे इतर वित्तीय साहाय्य मिळण्यास हक्कदार असणार नाही आणि विद्यापीठात प्रवेश घेतलेला कोणत्याही प्रकारच्या वित्तीय सहाय्यासाठी किव्हा शिष्यवृत्तीसाठी किव्हा शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी राज्य शासनाकडे मागणी करण्यास हक्कदार राहणार नाही. हे खासगी विद्यापीठ विधेयक रद्द करावे या मागणीसाठी छात्रभारती संगमनेरच्या वतीने सह्याद्री कॉलेज समोर विधेयकाची होळी करण्यात आली.

यावेळी छात्रभारतीचे राज्य कार्यवाह अनिकेत घुले, राज्य सहसंघटक गणेश जोंधळे, जिल्हा अध्यक्ष राहुल जऱ्हाड, ज्ञानेश्वरी सातपुते, आंचल खतोडे, नेहा काळे गायकवाड, श्रावणी कडलग, श्वेता गाडे, सुयश गाडे, प्रथमेश राऊत, रोशन सोनावणे, पूर्वा शिरसाठ, मोहम्मद तांबोळी, कार्तिक शेलार, संजना कांदळकर, समृद्धी वाकचौरे ,यादव संचेत ,रुषाली भागवत ,ओम काकड, सोहम घुले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
