सांस्कृतिक स्पर्धेत पोखरी हवेली शाळेचे यश !
प्रतिनिधी —
वडगावपान बीटस्तरावरील विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा जि.प.प्राथ. शाळा मनोली येथे उत्साहात संपन्न झाल्या. जि.प.प्राथ.शाळा पोखरी हवेलीची कु.शरयू संदीप गवांदे ही इ.३ री ते ४ थी या गटात हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजेती ठरली.तिची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

५ वी ते ८ वी या मोठ्या गटातील सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत “जागर स्वच्छतेचा” हे पथनाट्य प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.हा गट तालुकास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाला आहे.

सर्व स्पर्धकांचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड, शिक्षण विस्तार अधिकारी दीपक त्रिभुवन केंद्रप्रमुख, आशा घुले,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन आगळे,उपाध्यक्ष संदीप खैरे, सरपंच सुदाम खैरे,उपसरपंच सोमनाथ थिटमे यांनी अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक एकनाथ साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शकुंतला शेळके, सखाराम पाटील,राजेंद्र सूर्यवंशी, शिक्षक आजीनाथ घोडके, आर.जी.पावसे, सुरेश साळुंके, दस्तगीर शेख, सोमनाथ मदने आदींनी विशेष परिश्रम घेतले.

