रस्त्यावर न झालेल्या अपघाताची एक गोष्ट…!
विद्यार्थ्यांकडून रस्ते अपघात व सुरक्षा आपत्तीचे मॉक ड्रील…
प्रतिनिधी —
नैसर्गिक व मानवी आपत्तीमुळे दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यु होत असतांना, संगमनेर शहरातून जाणाऱ्या महामार्गावर अपघात झाल्यास प्राथमिक उपचार व मदतीची जाणीव निर्माण होण्यासाठी श्रीमती ललितादेवी मालपाणी शिक्षणशास्त्र महाविदयालयातील विद्यार्थ्यांनी रस्ते अपघाताचे पथनाट्य व माॅक ड्रिलचे सादरीकरण करून प्रत्यक्ष रस्ते अपघाताचा अनुभव दिला.

या माॅक ड्रिल मुळे न झालेल्या अपघाताची चर्चा महाविद्यालय परिसरात चर्चेचा विषय बनली. याप्रसंगी प्राचार्य डाॅ. भालचंद्र भावे, समाजसेवा विभागाचे समन्वयक प्रा. राजु शेख, वृत्तपत्र विभागाचे प्रा. सुशांत सातपुते उपस्थित होते.

पथनाट्य सादरीकरणातून श्रमिक जूनियर काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी रस्ते अपघात व सुरक्षा या विषयावर अपघातांच्या कारणांचे प्रदर्शन केले. तर मोबाईलच्या अती वापरामुळे अपघातांची संख्याही अधोरेखित केली. रस्ते अपघातात ताबडतोप उपचार होण्यासाठी रूग्णवाहिका, पोलिस स्टेशन व हाॅस्पिटलची माहिती कशी महत्वाची आहे याची जाणीवजागृती करून प्रत्यक्ष दोन विद्यार्थ्यांचा वाहन अपघाताचा देखावा करून रूग्णवाहिकेला दूरध्वनीद्वारे मदतीसाठी पाचारण केले.

माॅक ड्रिलसाठी आलेल्या रूग्णवाहिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले व न झालेल्या अपघाताची चर्चा संगगमनेर महाविद्यालय परिसरात सूरू झाली. मात्र यातून रस्ते अपघात सुरक्षा व उपचार किती महत्वाचे आहे याची जाणीव उपस्थितांना झाली. आपघातग्रस्तांना ताबडतोप उपचार मिळाल्यास रस्त्यांवर होणारे मृत्युचे प्रमाण कमी होते हा संदेश विद्यार्थांनी दिला.

या प्रसंगी परीक्षा विभागाचे प्रमुख प्रा. नयना पंजे, विद्यार्थी कल्याण मंडळ अधिकारी प्रा. विलास पांढरे, प्रा. ज्योती मेस्त्री, प्रा. मंगल आरोटे, प्रा. कविता काटे, प्रा. योगिता वाकचौरे यासह मोठ्या संख्येने शिक्षक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

