वाचन गटांच्या माध्यमातून जोडले १७५० विद्यार्थी !
प्रतिनिधी —
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड व ओढ निर्माण व्हावी म्हणू संगमनेर येथील सह्याद्री विद्यालयातील तुषार गायकर या ग्रंथपालाने २५७ वाचन गटांच्या माध्यमातून १७५० विद्यार्थी जोडले आहे. या सर्व विद्याथ्यांना वाचनाची आवड निर्माण झाली आहे. त्यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संगमनेर येथील सह्याद्री विद्यालयात तुषार गायकर हे ग्रंथपाल म्हणून काम करत आहेत. पाचवी ते दहावीमधील सर्व विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन चांगले भाषण करावे, हस्ताक्षर चांगले असावे, या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये रुजाव्यात म्हणून गायकर यांनी कामास सुरुवात केली. प्रथम २५७ वाचन गट तयार केले. त्यास १७५० विद्यार्थी जोडले गेले. त्यानंतर वयोगटानुसार विद्यार्थ्यांना प्रथम गोष्टीचे पुस्तके वाचण्यास देण्यास सुरुवात केली.

आज हे सर्व विद्याथों मन लावून पुस्तके वाचत आहे. विशेष बाब म्हणजे विद्यार्थी पुस्तक वाचल्यानंतर ते स्वतः आपल्या सुंदर अक्षरात आपला अभिप्राय सुद्धा लिहीत आहेत. त्यामुळे या माध्यमातून विद्याथ्यांमध्ये मोठी वाचन चळवळ उभी राहिली • आहे. हस्ताक्षर, वक्तृत्व स्पर्धामुळे विद्यार्थी भाषण करण्यास सुद्धा शिकले आहे. पूर्वी विद्यालयात विद्याथ्यांचे वाढदिवस साजरे होत असे, मात्र ती प्रथा बंद करून त्याऐवजी विद्यार्थी ग्रंथालयाला पुस्तके भेट देतात. जवळपास वर्षभरात चारशे ते साडेचारशे पुस्तके जमा होत आहेत. हा उपक्रम अनेक वर्षांपासून सुरू आहे. मुख्याध्यापक किसन खेमनर यांचीही साथ मिळत आहे.

