आश्वी बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप !
प्रतिनिधी —
सेवानिवृत्त मुख्याध्यापक शंकरराव विठोबा हिंगे गुरुजी यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा गुणगौरव म्हणून ७८ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या परिवाराकडून आश्वी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुले व मुलीना २४० दप्तरांचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप पवार, सदस्य बाबा मांढरे गुरुजी, गणेश पांढरे, दत्ता पंडित, कहार, ग्रामस्थ राजेंद्र गायकवाड, सर्व शिक्षक वृंद, दिग्विजय मंडळाचे सदस्य आणि हिंगे परिवार उपस्थित होते.

शंकरराव हिंगे गुरूजी यांचे चिरंजीव सुनिल हिंगे हे माध्यमिक शिक्षक तर दुसरे चिरंजीव. अनिल हिंगे यांची पुणे येथे स्वतःची औद्योगिक प्रकल्प व्यवस्थापनाची कंपनी आहे. या कंपनीमध्ये त्यांनी आश्वी परिसरातील अनेक शिक्षित मुलांना सामावून घेतले असून या कंपनी मार्फत ते पंढरपूर वारीतील वारकऱ्यांना मदत, पुरग्रस्तांना मदत तसेच शाळेंना शैक्षणिक साहित्याची मदत करत असतात.

मंगळवारी प्राथमिक शाळेतील मुलाना दर्जेदार दप्तरांचे वितरण करुन त्यांनी आपण शिकलेल्या शाळेशी आणि गावाशी जोडलेली नाळ घट्ट केली. यावेळी सुनील हिंगे आणि अनिल हिंगे या दोन्ही बंधूंनी प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेच्या मराठी माध्यमातूनच होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. नवीन दप्तर मिळाल्याने सर्व विद्यार्थी मुलामुलीच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. हौशीराम मेचकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालण केले.

