ऊस तोडणी कामगारांचे शाळाबाह्य मुले शिक्षण प्रवाहात

 प्रतिनिधी —

शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करत असताना समनापुर परिसरात ऊस तोडणी कामगारांच्या झोपड्या मधील सहा ते चौदा वयोगटातील 26 विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे आढळून आले. या सर्वांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समनापुर (मराठी) येथे शिक्षण प्रवाहात दाखल करून घेण्यात आले. केंद्रप्रमुख आशा घुले यांच्या मार्गदर्शनाखाली समनापुर शाळेतील शिक्षकांनी हे काम केले आहे.

नुकताच या सर्व विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव करण्यात आला याप्रसंगी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड, शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र भालारे, दीपक त्रिभुवन, केंद्रप्रमुख आशा घुले, नंदा वलवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष खेमनर, मुख्याध्यापिका राजश्री कर्पे, एकनाथ साबळे, सुनील झावरे आदिसह पालकवर्ग उपस्थित होता.

शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. एक वही व पेन तसेच गुलाबपुष्प देऊन त्यांना प्रोत्साहीत करण्यात आले. कुटुंबाच्या आर्थिक अडचणीमुळे काही कुटुंबे वेगवेगळ्या कामानिमित्त स्थलांतर करतात. यावेळी ते आपली मुलं बाळही सोबतच आणत असतात. त्यामुळे ही मुलं शिक्षणापासून वंचित राहतात. अशा मुलांना नजीकच्या शाळेत दाखल करण्याचे आवाहन ऊसतोडणी कामगारांना गटशिक्षणाधिकारी गुंड यांनी केले. विस्तार अधिकारी त्रिभुवन व केंद्रप्रमुख घुले यांनीही मनोगत व्यक्त केले. या विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी आणखी मदत हवी आहे.

शाळाबाह्य सर्वेक्षण व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक वैभव जोशी, नामदेव वाडेकर, सुनिता जोंधळे, किरण खैरनार, आफ्रिनबानो शेख, मतीन शेख, मनीषा शिंदे, योगिता गोफणे आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका कर्पे यांनी तर आभार प्रदर्शन पंकज कवडे यांनी केले. सूत्रसंचालन भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!