शिक्षणानेच मानव सक्षम नागरिक होतो — प्रा.डॉ. मेहबूब सय्यद
प्रतिनिधी —
मानवाला लागणाऱ्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांबरोबरच आरोग्य व शिक्षणाची तेवढीच गरज असते म्हणूनच आपला मूलभूत अधिकार व विकासाचा मार्ग शोधून सक्षम नागरिक व्हायचे असेल तर शिक्षणानेच ते साध्य होणार असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. मेहबूब सय्यद यांनी केले आहे.

एकता सामाजिक सेवाभावी संस्था व संदेश लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल येथे आयोजित भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या १३५ व्या जयंती सोहळ्यात आपले मूलभूत अधिकार व शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राधेश्याम गुंजाळ हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सेंट मेरी धर्मग्राम प्रमुख फादर सायमन शिनगारे, माजी नगरसेवक डॉ.दानिश खान, हाजी इसहाकखान पठाण, नूर मोहम्मद शेख, प्रा.रिजवान शेख, संदेश लायब्ररीचे संचालक अब्दुल अजीम, अब्दुल कादिर, नाजीम तांबोळी, अँड. अजहर सय्यद, शरद थोरात, प्रा.बाबा खरात आदी यावेळी उपस्थित होते.

प्रा. डॉ. सय्यद म्हणाले की, युवाशक्ती ही राष्ट्रीय एकात्मतेची पहिली पायरी असल्याचे सांगून प्रत्येक युवकांनी आजच्या गंभीर समस्येचा, गुलामगिरीचा, व्यसनी प्रवृत्तीचा, ढोंगी श्रद्धेचा बारकाईने विचार करून आजच्या धकाधकीच्या युगात भरकटत जाणाऱ्या विचारातून सर्वत्रच अविचाराचे डोंब उसळत आहे. याला पायबंद घालण्यासाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांचे योगदान व संघर्ष आदर्शवत ठेवून युवा पिढीने पुढे आले पाहिजे.

संस्थेच्या वतीने यावर्षीच्या राज्यस्तरीय पुरस्काराने स्वर्गीय मिर्झा खालीद शेख – आदर्श समाजरत्न अब्दुल अजीज वोहरा, उदयन्मुख नारीशक्ती – फरजाना शेख तर मौलाना अबुल कलाम आझाद आदर्श समाजरत्न म्हणून भगवान सदावर्ते यांना डॉ. राधेश्याम गुंजाळ, प्रा. सय्यद, व फा. सायमन शिनगारे प्रमुख पांहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

तसेच प्रथमच मराठी भाषेमध्ये भरवलेल्या दिव्य कुरआन आणि आधुनिक विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी संगमनेर करांनी गर्दी होती. संदेश लायब्ररी पुणे यांच्यावतीने पुस्तकांचा संच मोफत देण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एकता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष असिफ शेख, अनिल भोसले, मार्गदर्शक सचिन साळुंखे, पत्रकार शौकत पठाण, इरफान शेख, जाकीर शेख, सुनील उकिर्डे, राजूभाई इनामदार, जानकीराम भडकवाड, राम सिमरे, फैरोज पठाण, अफसर तांबोळी, मुजाहिद पठाण, हाजी आसिफ पठाण, कारभारी देव्हारे, अरविंद गाडेकर, शोएब सय्यद आदींसह मोठ्या संख्येने सर्व धर्मीय बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल भोसले यांनी केले तर आसिफ शेख यांनी आभार मानले.

