लायन्स सफायरचे कार्य प्रेरणादायी — आमदार  सत्यजित तांबे

वंचित मुलांसोबत साजरी केली ओम साई दिवाळी…

प्रतिनिधी — 

संगमनेर लायन्स सफायरचे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे.

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणार्‍या लायन्स संगमनेर सफायरने यावर्षी ओम साई दिवाळीचे आयोजन मालपाणी हेल्थ क्लब येथे केले होते.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे व इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट रचना मनीष मालपाणी उपस्थित होते.

कोरोनानंतर अनेकांची घरे उध्वस्त झाली, संसार उघड्यावर पडले, अनेक मुले अनाथ झाली. वंचित मुलांच्या चेहर्‍यावर हास्य फुलविण्यासाठी या ओम साई दिवाळी मेळ्याचे आयोजन करत असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी यांनी सांगितले.

५०० वंचित मुलांसाठी या दिवशी डी.जे. नाईट, मुलांचे डान्स कार्यक्रम, डिनर, गिफ्ट, दिवाळी मिठाई वाटप आणि भव्य आतिषबाजीचे नियोजन करण्यात आले होते. श्री साईबाबांनी लक्ष्मी नावाच्या छोट्याशा मुलीसोबत पाण्याने दिवे लावून दिवाळी साजरी केली. ओम साई दिवाळी मेळा निमित्ताने वंचित मुलांचा दिवाळीमधील आनंद द्विगुणीत झाला.

ओम साई दिवाळी मेळ्याचे प्रकल्प प्रमुख म्हणून गिरीश मालपाणी, श्रीनिवास भंडारी, देवीदास गोरे, अनिरूध्द डिग्रसकर, राजेश मालपाणी, महेश डंग काम बघितले असून अध्यक्ष अतुल अभंग, सचिव जितेश लोढा, खजिनदार कल्पेश मर्दा यांच्या मार्गदर्शनाखील लायन्स सफायरमधील सर्व सदस्यांनी प्रकल्प यशस्वी होण्यासाठी मदत केली.

रचना मालपाणी, संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी, श्रीनिवास भंडारी, अध्यक्ष अतुल अभंग लायन्स सफायर सदस्य आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुनिता मालपाणी व पूजा मर्दा यांनी केले तर आभार श्रीनिवास भंडारी यांनी मानले.

संग्राम मूकबधिर विद्यालय, सांदीपनी गुरू आश्रम, रमा यशोधरा विद्यार्थिनी आश्रम, रिमांड होम, जय शंकर बालगृह यामधील ५०० विद्यार्थी या दिवाळी मेळाव्यामध्ये सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांनी यावेळी लोककला, नृत्य, भजन यांचे सादरीकरण केले. मूक बधिर शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेले अभंग आणि नृत्य बघून सर्वजण चकित झाले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!