अमेरिकेत होणाऱ्या जागतिक विमा परिषदेसाठी धनश्री कडलगची निवड !

 प्रतिनिधी —

येथील एचडीएफसी लाईफ इ्शुरन्स कंपनीची अभिकर्ता धनश्री सुनील कडलग हिला प्रतिष्ठेचा एमडीआरटी हा सन्मान प्राप्त झाला आहे. हा बहुमान प्राप्त झाल्यामुळे ती ९ ते १२ जून २०२४ या कालावधीत होणाऱ्या जागतिक विमा परिषदेसाठी व्हँकुव्हर या अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील क्लार्क काउंटीमध्ये असलेल्या कोलंबिया नदीच्या उत्तर तीरावरील शहरात या परिषदेत सहभागी होणार आहे.

धनश्री हिला एमडीआरटी होण्यासाठी तिचे वडील कडलग इन्व्हेस्टमेंटचे संस्थापक सुनील कडलग यांच्यापासून प्रेरणा मिळाली . सुनील कडलग हे गेल्या २७ वर्षापासून म्युच्युअल फंड वितरक, जीवन व मेडिक्लेम विमा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. येथील कडलग इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून त्यांनी या क्षेत्रात कार्य केले आहे. ग्राहकांच्या जीवनातील उद्दिष्टे प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना आर्थिक क्षेत्रातील पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत.

जागतिक विमा परिषदेसाठी पात्र होण्यासाठी धनश्री कडलग हिला एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनीचे शाखाधिकारी दिपक मोरे, विकास अधिकारी सोहेल शेख व कडलग यांचे मार्गदर्शन लाभले आहे. धनश्रीच्या एचडीएफसी लाईफ एजन्सीच्या प्रदार्पणातच पहिल्याच वर्षी एमडीआरटी हा बहुमान प्राप्त झाल्याने कडलग इन्व्हेस्टमेंटची दुसरी पिढी या क्षेत्रात कार्यरत झाल्याचा संदेश दिला गेला आहे. धनश्री हिच्या यशाबद्दल तीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!