ॲड. सीमा काळे-सातपुते यांना आधारचा “आदर्श समाज भूषण प्रेरणा गौरव” पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी —

विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संगमनेर मधील नामांकित महिला वकील सीमा काळे-सातपुते यांचा पिंपरी चिंचवड (पुणे) येथे राष्ट्रीय फिनिक्स गोल्ड स्टार अवार्ड सोहळ्यात “आदर्श समाज भूषण प्रेरणा गौरव” पुरस्काराने नुकताच सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यामध्ये कार्यरत असलेल्या आधार सोशल फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रात प्रभावी कामगिरी करणाऱ्यांना या पुरस्काराचे दरवर्षी वितरण करण्यात येते.

ॲड. सातपुते-काळे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना आयोजित कार्यक्रमात “आदर्श समाज भूषण प्रेरणा गौरव” पुरस्काराचे अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या मानसकन्या व कल्याणी महिला सेवाभावी संस्थेच्या संस्थापक डॉ. सुनीताताई मोडक, निवृत्त जिल्हा न्यायाधीश रवींद्र कुलकर्णी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शहाबुद्दीन पठाण, लेखक प्रकाश कदम, ढोगसांगवीचे उपसरपंच योगेश मलगुंडे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

यावेळी डॉ. दिलीप नेवसे, कल्याणी कुलकर्णी, वाल्मीक वाघ, डॉ. काळूराम मलगुंडे, डॉ. संभाजी बन्ने, प्रिया वाघ, धोंडीबा कुंभार आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी पुरस्कारार्थींच्या कार्याचे कौतुक केले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!