जयहिंद लोकचळवळच्या ‘सुदृढ ग्राम प्रकल्प’ अंतर्गत पेमगिरी येथे आढावा बैठक !
प्रतिनिधी —
जयहिंद लोकचळवळच्या सुदृढ ग्राम प्रकल्प अंतर्गत आज पेमगिरी येथे गावातील शाळेसाठी ‘चौदाखडी किट’ चे वाटप करण्यात आले. यावेळी जयहिंद लोकचळवळ मार्फत राबविण्यात येणाऱ्या LEAP प्रकल्प, एकात्मिक शेती, वाचन चळवळ तसेच इतर सर्व उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. जयहिंदच्या संकल्पनेतून साकारलेल्या क्रीडांगण व परसबागेचीही यावेळी पाहणी करण्यात आली.

आगामी काळात सुदृढ व निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी फक्त पेमगिरीच नाही तर राज्यातील प्रत्येक गावात जयहिंद लोकचळवळचे उपक्रम राबवले जातील अशी भूमिका डॉ. सुधीर तांबे यांनी स्पष्ट केली. या बैठकीला पेमगिरीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,युवक आणि इतर सर्व पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

