अफाट जनसंपर्क आणि प्रचंड ऊर्जा असलेलं असाधारण नेतृत्व : डॉ.सुधीर तांबे
पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक जण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. शुभेच्छा देत आहेत. काही जण विविध लेख लिहून आमदार तांबे यांच्या सामाजिक कार्याविषयी माहिती देत आहेत. त्यांच्या विषयी व्यक्तिगत माहिती देत आहेत.
तांबे यांच्या सोशल मीडिया चे काम पाहणारे समीर कडलग यांनी आमदार तांबेंवर लिहिलेले लेख
समीर कडलग
उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरातील असंख्य युवकांशी प्रत्यक्ष संपर्क असलेलं नाव म्हणजे डॉ.सुधीर तांबे साहेब.
ज्यांना नेहमीच नेता नव्हे तर मित्र म्हटलं जातं त्याच कारणही तसंच आहे, कोणीही त्यांच्याशी अगदी सहज संपर्क साधू शकतं. तेही देखील प्रत्येकाच्या कॉल वर स्वतःच बोलून समस्या, प्रश्न जाणून घेणार.
त्यांच्यासोबत काम करताना मला त्यांचे अनेक गुण भारावून टाकणारे होते, कुठलाही बडेजाव नाही, व्यक्तीच्या क्षमता जाणून घेत जबाबदारी देणे, कमतरता भरून काढण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी सहकाऱ्यांना उपलब्ध करून देणे, स्वतःला कायम व्यस्त ठेवणे, नाविन्याचा ध्यास, कायम सकारात्मक आणि व्यापक विचार, नवनवीन गोष्टी शिकत राहणे, माहीत नसलेल्या गोष्टी भलेही तो लहान का असेना परंतु सामान्य राहून जाणून घेणे.
युवक हा त्यांचा सर्वात आवडीचा घटक, वेगवेगळ्या माध्यमातून युवकांशी संवाद साधत त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न ते सातत्याने करत असतात. उच्च पदावर काम करत असलेले तसेच युवा उद्योजक यांच्या माध्यमातून होतकरू युवकांसाठी प्रशिक्षण आणि शिबिरे त्यांनी आयोजीत केलेली आहे.
भल्या पहाटे उठून नित्य नियमाने व्यायाम करून शरीर आणि मनाला फिट ठेवत दिवसभरात अनेकांचे प्रश्न ते सोडवत असताना आपल्यापैकी कोणीही त्यांना थकलेले पहिले नसेल. कारण कायमच लोकांमध्ये रमणाऱ्या या माझ्या स्पूर्तिस्थानाला जन्म दिनानिमित्त उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना!
– समीर कडलग
प्रमुख – सोशल मीडिया
(आ.डॉ.सुधीर तांबे)
