मतदार जागृतीसाठी संगमनेर महाविद्यालयाचा जिल्हा निवडणूक कार्यालयाबरोबर सामंजस्य करार

प्रतिनिधी

युवकांमध्ये लोकशाही मूल्य संवर्धन व मतदार जागृती व्हावी या उद्देशाने संगमनेर महाविद्यालय व जिल्हा निवडणूक कार्यालय आणि वर्शिप अर्थ फाऊंडेशन यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ. रवींद्र ताशिलदार, नोडल अधिकारी डॉ.श्रीनिवास भोंग, संतोष फापाळे व वर्शिप अर्थ फाऊंडेशनचे साहिल तुपे उपस्थित होते. सदर सामंजस्य करार अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाला.

या कराराअंतर्गत महाविद्यालयात निवडणूक साक्षरता क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या क्लबद्वारे नवमतदारांना निवडणूक प्रक्रीयेची माहिती होण्यासाठी उपक्रमांचे आयोजन केले जाते. महाविद्यालयाचे विद्यार्थी संग्राम नवले व अंकिता रहाणे यांची या उपक्रमात ब्रँड अँबेसिडर म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांचेद्वारे निवड करण्यात आली आहे.

या उपक्रमात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची कार्यकारी समिती स्थापन केली जाणार असून विद्यार्थ्यांमधून अध्यक्ष, उपाध्यक्ष व वर्गप्रतिनिधी निवडले जातील. निवडणूक साक्षरता क्लबच्या अँबेसेडर विद्यार्थ्याला जिल्हा निवडणूक कार्यालयाद्वारे सहा महिन्यांसाठी इंटर्नशिप दिली जाणार आहे. या उपक्रमात अधिकाधिक मतदार नोंदणी करणाऱ्या महाविद्यालयांची जिल्हा पातळी व राज्य पातळी पुरस्कारासाठी शिफारस केली जाणार आहे. या उपक्रमासाठी  जे.के.आभाळे, डी.बी. वाळे यांचे सहकार्य लाभले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!