लायन्स संगमनेर सफायरतर्फे लहान मुलांच्या भजन स्पर्धेचे आयोजन
विविध पारितोषिके ; २५ सप्टेंबरपर्यंत व्हिडिओ पाठविण्याची मुदत
प्रतिनिधी —
लायन्स क्लब संगमनेर सफायरतर्फे लहान मुलांच्या तीन वयोगटांसाठी भजन स्पर्धेचे आयोजन रविवार दि. १ आक्टोबर २०२३ रोजी मालपाणी क्लब येथे करण्यात आलेले आहे.

वयोगट ७ ते ९, १० ते १२ व १३ ते १५ अशा तीन गटांमध्ये ही स्पर्धा असून प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकास रू. १०००, द्वितीय क्रमांकास रू. ७००, तृतीय क्रमांकास रू. ५०० तर उत्तेजनार्थ रू. ३०० असून एकूण ७५०० रूपयांची रोख पारितोषिके असणार आहेत. सर्व पारितोषिके मालपाणी ग्रुप तर्फे देण्यात येणार आहेत.

संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी, श्रीनिवास भंडारी, अध्यक्ष अतुल अभंग, सचिव जितेश लोढा, खजिनदार कल्पेश मर्दा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प प्रमुख प्रियंका मणियार, रितीका भंडारी, पुजा कासट कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत. या स्पर्धेची प्रवेश फी रू. १०० असणार आहे.

कोणत्याही देवावर आधारीत ही भजन स्पर्धा वैयक्तिक आहे. ऑडिशन व्हिडिओ पाठविताना प्रथम नाव आणि वय सांगून भजन गाण्यास सुरूवात करावी. कुठलेही कटिंग, एडिटिंग, म्युझिक यांचा वापर न करता व्हिडिओ पाठवायचा आहे.

व्हिडिओ पाठवण्याचे मोबाईल क्रमांक ७५८८०९३४१६, ९४०४९७७११३, ९०९६७४३४९३ या नंबरवर २५ सप्टेंबर २०२३ संध्याकाळी ५ पर्यंत व्हिडिओ पाठवायचा आहे. परिक्षक जो व्हिडिओ निवडतील त्या स्पर्धकाची अंतिम फेरीमध्ये निवड होईल.

अंतिम फेरी दि. १ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी २.३० ते ५ या वेळेत मालपाणी क्लब येथे होईल अशी माहिती संयोजकांनी दिली आहे. या प्रकल्पासाठी उमेश कासट, मेघा अट्टल, नम्रता अभंग, पुष्पा गोरे, वंदना मणियार, स्मिता मणियार, प्रिती काळे, सिमरन भंडारी व सर्व पदाधिकारी मेहनत घेत आहेत.

