संगमनेर तालुक्यातील क वर्ग तीर्थक्षेत्र विकासासाठी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील विविध गावांसाठी सन २०२३ – २०२४ या आर्थिक वर्षासाठी क वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ३५ लाख रुपयांचा निधी मिळवला असल्याची माहिती यशोधन कार्यालयातील प्रसिद्धी विभागाकडून देण्यात आली आहे.

आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक गावात सातत्याने विकासाच्या योजना राबवताना पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. संगमनेर तालुक्यातील विविध गावांसाठी सन २०२३ – २०२४ या आर्थिक वर्षासाठी क वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ३५ लाख रुपयांचा निधी मिळवला आहे.

या अंतर्गत धांदरफळ खुर्द श्री.बिरोबा मंदिर देवस्थान परिसर सुशोभीकरण करणेसाठी २० लाख रूपये, सायखिंडी प.पु. अमरगिरी महाराज खानेश्वर देवस्थान परिसर सुशोभीकरण करणेसाठी ७ लाख ५० हजार रूपये, पारेगाव बु॥ श्री.रेणुकामाता देवस्थान परिसर सुशोभीकरण करणेसाठी ७ लाख ५० हजार रूपये निधी मंजूर झाला आहे. या निधीमधून या मंदिर परिसरामध्ये काँक्रिटीकरण, पेविंग ब्लॉक बसवणे, लाईट सुविधा, पिण्याचे पाणी यांसह विविध सोयी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.

या तीर्थक्षेत्रांना मिळालेल्या निधीबद्दल धांदरफळ खुर्द, सायखिंडी, पारेगाव बु॥ येथील ग्रामस्थांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचे आभार व्यक्त केले असून या मिळालेल्या निधीतून वरील विविध गावांमधील क तीर्थक्षेत्र असलेल्या मंदिर परिसराच्या सुशोभीकरण कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.

