‘गोवा टॅक्सी ॲप’ चे लोकार्पण !

पर्यटकांना मिळणार सुखकर आणि सुरक्षित प्रवास

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

बहुचर्चित ‘गोवा टॅक्सी ॲप’चे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण करण्यात आले. हे ॲप गेल्या ६ महिन्यांपासून मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टॅक्सी काऊंटरवर कार्यरत आहे.

५०० हून अधिक टॅक्सी ऑपरेटर आधीच या ॲप आधारित सेवेत सहभागी झाले आहेत. उरलेल्या टॅक्सी व्यावसायिकांनीही या सेवेत सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटनमंत्री खंवटे यांनी केले आहे.

गोवा टॅक्सी ॲपची खासियत

चालक नोंदणी आणि ग्राहक सेवेसाठी ॲप.

राज्यातील रहिवासी आणि पर्यटकांसाठी कॅब सेवा.

चालक, प्रवासी आणि कमांड सेंटरसाठी रिअल-टाईम अपडेट.

किफायतशीर भाडे, वेळ, स्थान आणि मार्गांवर आधारित सेवा.

स्थान सेवांसाठी गुगलवर नकाशांसह दिशादर्शन.

पेमेंट : वॉलेट, सर्व कार्डस आणि युपीआय पेमेंटसाठी पेमेंट गेटवे.

टॅक्सी बुक करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून ‘गोवा टॅक्सी ॲप’ सहज डाऊनलोड.

केवळ १६ एमबी साईज

आतापर्यंत सुमारे ३० हजार पर्यटकांनी घेतला सेवेचा लाभ

कारपुलिंग आणि इतर उपक्रमांच्या प्रोत्साहनासाठी किनारपट्टी, औद्योगिक वसाहती आणि महत्त्वाच्या ठिकाणी सेवा.

प्रवाशांसाठी एसओएस (आणीबाणीच्या परिस्थितीत).

चालकांसाठी एसओएस (अपघात/ब्रेकडाऊनसंदर्भात)

दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळी टॅक्सी बुक करणे सहजसोपे.

स्वस्त दरात चालकासहीत कॅब : स्वचलित कार किंवा बाईकपेक्षा श्रेयस्कर.

युनिफाईड टॅक्सी ॲपप्रणाली वापरून प्रवासी चालकास गुण देणे शक्य.

अयोग्य वर्तनाच्या कोणत्याही घटनांची करता येणार तक्रार.

कॉल सेंटरद्वारे मदतीची विनंती करता येणार.

महिला प्रवाशांच्या संरक्षणाशी संबंधित अनेक बाबींचा समावेश.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!