आयुष्मान भव: योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा — उपनगराध्यक्ष वडजे
अकोले प्रतिनिधी —
नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून आयुष्मान भव: हा कार्यक्रम सरकारने हाती घेतला असून याअंतर्गत नागरिकांच्या आरोग्यासाठी अनेक उपक्रम होणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा असे अवाहन अकोले नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांनी केले.

अकोले ग्रामीण रुग्णालयात आज दुपारी “आयुष्मान भव:” या उपक्रमाचा उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांचे शुभहस्ते व रुग्ण कल्याण समितीचे सदस्य प्रा.सुरेश खांडगे यांचे अध्यक्षतेखाली शुभारंभ करण्यात आला. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.बाळासाहेब मेहेत्रे, नगरसेवक चाैधरी, माजी नगरसेवक परशराम शेळके, नवनाथ मोहिते, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोपेरे करवंदे, डॉ. रहाणे, डॉ.प्रज्वल मुंढे उपस्थित होते.

वडजे म्हणाले की, अकोले ग्रामीण रुग्णालयात अतिशय उत्तम पद्धतीने रुग्ण सेवा दिली जात आहे. येथील वैद्यकीय उपचारांचा नावलौकिक तालुक्यात वाढल्याने ग्रामीण रुग्णालयाकडे लोकांचा कल वाढला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आयुष्मान भारत या संकल्पनेतून देशातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे. या योजने अंतर्गतच आज आयुष्मान भव: हा उपक्रम देशवासीयांसाठि सुरू केला आहे.

प्रा. सुरेश खांडगे म्हणाले की, सर्वात पुण्याचे व समाधानाचे काम करण्याचे भाग्य या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाभत असते. यांच्या प्रत्येक कृतीतून समाधान मिळते. कोणत्याही विभागाचा प्रमुख अर्थात कर्ता पुरुष जर कर्तबगार, चांगला असेल तर त्या विभागात कोणत्याही प्रकारे अडचण येत नाही. तेथे निश्चितच चांगले काम होत असते. कर्तव्यावर जास्त निष्ठा आसल्याने निश्चितपणे चांगले काम या ग्रामीण रुग्णालयात होत आहे. ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी नागरिकांचा कल वाढला आहे. तसेच आज केद्र व राज्य सरकारच्या सामाजिक उपक्रमांतर्गत आयुष्मान भव: हा उपक्रम सुरु होत आहे. याउपक्रमांतर्गत स्वच्छते पासून आरोग्यापर्यंत अनेक उपक्रम होणार आहेत. तसेच अवयव दान हि सुंदर संकल्पना आहे. प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करावा असे अवाहनही प्रा. खांडगे यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व सर्वाना अवयवदानाची शपथ डॅा. संदीप कडलग यांनी दिली. तर आभार पाटील यांनी मानले. यावेळी रुग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

