वाळूचोरी व वाहतुकीमुळे शेत जमीन खचली..
शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा…
तलाठ्याला २१ वेळा फोन केला तरी दखल घेतली जात नाही..
तक्रारीत तथ्य नाही ; वाळू चोरी वर कारवाई होईल — प्रांताधिकारी

प्रतिनिधी
शेती लगत नदीचे पात्र असल्यामुळे त्यातून होणाऱ्या वाळू चोरी आणि वाहतुकीने शेतीचा काही भाग खर्च चालला असून धोका निर्माण झाला आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही तलाठी व संबंधित अधिकारी कारवाई करत नाहीत. त्यामुळे आता मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही असा इशारा एका शेतकऱ्याने दिला आहे.
तालुक्यातील मंगळापुर येथील शेतकऱ्याने संगमनेरच्या प्रांत अधिकाऱ्याला दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, माझ्या शेतीच्या क्षेत्रा लागत प्रवरा नदीचे पात्र आहे. या पत्रातून सातत्याने वाळू उपसा चालू असतो. तसेच वाळू वाहतूकही मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यामुळे माझे क्षेत्र खचत चालले आहे आणि शेतीला धोका उत्पन्न झाला आहे.
या संबंधाने मी वारंवार तक्रारी केल्या आहेत. तलाठी, ग्रामसेवक, सरपंच या सर्वांना तक्रारी करून देखील संबंधितांवर कुठलीही कारवाई होत नाही. त्यामुळे मला आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही. आपण संबंधितांवर कारवाई करावी अशी विनंती या अर्जात करण्यात आलेली आहे.
तसेच संबंधित तलाठ्याला एकवीस वेळा फोन केला तरी कोणत्याच प्रकारचे उत्तर दिले जात नाही. अशी खंतही या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी ,अनेकवेळी तक्रादारा च्या तक्रारी नुसार स्पॉट वर जाऊन आलेत, नमूद वस्तुस्थिती तशी नसल्याचे आढळून आले आहे.
मात्र वाळूचोरी विरोधात कारवाई केली जाईल.
शशिकांत मंगरुळे, प्रांताधिकारी, संगमनेर
