निळवंडे कालव्यांची ३१ मे रोजी चाचणी !

धरणाच्या कामाबाबत कोण काय बोलतो यापेक्षा आता लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची इच्छा पूर्ण होत आहे याला माझ्या दृष्टीने महत्व आहे. शेतकऱ्यांचा त्याग आणि त्या त्या वेळच्या सरकारने निर्णय करून धरणाचे कालव्यांचे काम पूर्ण करण्यासाठी निर्णय घेतल्यामुळेच आता पाणी देण्याचा ऐतिहासिक क्षण अनुभवता येणार आहे .

 राधाकृष्ण विखे पाटील , महसूल मंत्री 

 

प्रतिनिधी —

उतर नगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थीतीत ३१ मे रोजी घेण्यात येणार असल्याची माहीती महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. पाच तालुक्याचे लाभक्षेत्र असलेल्या शेतकर्यासाठी ऐतिहासिक क्षण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निळवंडे धरणाच्या कार्यस्थळावर जेष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी अधिकारी यांची बैठक घेवून ३१ तारखेच्या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या संदर्भात आढावा घेतला ३१ मे रोजी सकाळी १० वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार्या या कार्यक्रमाच्या स्थळाची पाहाणी करून त्यांंनी सूचना केल्या. येत्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही दौरा होण्याची शक्यता लक्षात घेवून त्याचेही नियोजन आतापासूनच सुरू करण्याबाबतही मंत्री विखे पाटील यांनी सूचित केले.

याप्रसंगी माजी आमदार वैभव पिचड जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ जलसंपदा विभागाचे अभियंता अरूण नाईक पोलीस उपअधिक्षक नारायण वाकचौरे सार्वजनीक बांधकाम विभागाचे अभियंता श्रीनिवास वर्पे कृषी विभागाचे गायकवाड भाजपाचे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी शिवाजी धुमाळ यांच्यासह पदाधिकारी शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री विखे यांंनी बैठकीमध्ये कालव्याच्या कामाचा आढावा घेवून चाचणी झाल्यानंतर यातील त्रृटी दूर करण्याच्या सूचना त्यांनी जेष्ठ नेते मधुकर पिचड यांनी काही प्रलंबित काम मार्गी लावण्याबाबत केलेल्या सूचनांची तातडीने कार्यवाही करण्याचे आदेशही मंत्री विखे पाटील यांनी दिले.

धरणासाठी जमीनी गेलेल्या शेतकऱ्यांना गायरान जमीनी देण्यात आल्या होत्या या जमीनीच्या बाबतीत अद्यापही प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित असल्याने याबाबत तातडीने प्रस्ताव तयार करून पाठविणाच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी सालीमठ यांना दिल्या याबबात धोरणात्मक निर्णय शासन स्तरावर घेवून न्याय मिळवून देण्याची ग्वाही मंत्री विखे यांनी दिली.

धरणाच्या उजव्या कालव्याचे कामाची माहीती त्यांनी जाणून घेतली.ही काम पूर्ण होण्यास तीन महीन्याचा कालावधी लागणार असला तरी दोन महीन्यात काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवूनच ही काम पूर्ण करण्याबात विभागाने कार्यवाही करावी असे त्यांनी स्पष्ट केले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!