अकोले ग्रामीण रुग्णालयात सात दिवस स्वच्छता दिन !
नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी यांच्या उपस्थितीत “सुंदर माझा दवाखाना ” उपक्रमास सुरुवात
प्रतिनिधी —
जागतिक आरोग्य दिनामिमित्ताने राज्य शासनाचा “सुंदर माझा दवाखाना ” हा चांगला उपक्रम आहे. या उपक्रमा निमीत्त अकोले ग्रामीण रुग्णालयात ७ दिवस स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. असे उपक्रम वर्षभर राबविले पाहिजेत व ग्रामीण रुग्णालयात नागरिकांचा उपचारासाठी कल वाढला पाहिजे अशी अपेक्षा अकोलेच्या नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी यांनी व्यक्त केली.

जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने राज्य सरकारच्या निर्देशाने राज्यभरातील रुग्णालयात “सुंदर माझा दवाखाना” उपक्रम घेतला जात असुन आज अकोले ग्रामीण रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय घोगरे व वैद्यकीय अधिक्षक डॉ.बाळासाहेब मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सुंदर माझा दवाखाना” उपक्रमाची सुरुवात अकोलेच्या नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी यांचे हस्ते करण्यात आली.

यावेळी उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, न.प.आरोग्य सभापती शरद नवले, नगरसेवक विजय पवार, भाजपा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, साैरभ देशमुख व लालातारा मेडिकल फाउंडेशनचे सचिन आवारी, आत्मा ग्रृप अकोलेचे अध्यक्ष डॉ. सचिन नवले, सचिव डॉ.संदेश भांगरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील साळुंके, डॉ.राहुल कवडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्यामकांत शेटे, पत्रकार संघाचे सचिव अलताफ शेख उपस्थित होते.

नाईकवाडी म्हणाल्या कि, पंतप्रधान नरेद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेने राज्यात सुंदर माझा दवाखाना हा अतिशय चांगला उपक्रम राबविला जात आहे .अकोले ग्रामीण रुग्णालयात चांगले काम होत असल्याने येथे रुग्णांची संख्या जास्त असते व सुविधाही चांगल्या दिल्या जातात.

या उपक्रमाने निश्चितच ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी येण्याचा लोकांचा कल वाढेल व आरोग्याच्या सुविधा सुलभ होतील. शासनाचा हा उपक्रम सात दिवस चालणार असुन या उपक्रमासाठी नगरपंचायतचे आरोग्य कर्मचारी रुग्णलयास हवी ती मदत करतील. अशी ग्वाही देवून त्यांनी सर्वाना जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. साळुंके यांनी सुंदर माझा दवाखाना अभियान ७ ते १४ एप्रिल पर्यत सुरु असुन यामाध्यामातुन रुग्णालयात स्वच्छ व प्रसंन्न वातावरण तयार करण्यात येणार आहे. अकोले ग्रामीण रुग्णालयात रुग्णांनासाठी अनेक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असुन ॲडमिट रूग्णांना मोफत जेवणही दिले जाते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.संदिप कडलग यांनी केले तर आभार डॉ.राजेश केवारे यांनी मानले. लालतारा मेडिकल फाउंडेशनच्या वतीने रुग्णालयाच्या स्वच्छतेसाठी फिनेल, झाडू , खराटे देण्यात आले. आत्मा ग्रृपचे सर्व डॅाक्टर्स, अकोले तालुका पत्रकार संघाचे सदस्य यांनी रुग्णालय परिसरात साफ सफाई करत स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.

यावेळी डॉ. जयसिंग कानवडे, डॉ.अजय शिंदे, डॉ. दशरथ धांडे, डॉ.पुरुषोत्तम आरोटे, डॉ. तेजस शहा, डॉ. पुनम कानवडे, डॉ.मंजुश्री राहाणे, डॉ. नमिता चासकर तसेच प्रणिता शिंदे, गोकुळ गायकवाड, लालतारा मेडिकलच्या संचालिका आवारी, धनराज भरसट आदि उपस्थित होते.

