संगमनेर तालुक्यातील शेत-पाणंद रस्त्यांसाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर ;
१२३ गावांचा समावेश
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील व वाडीवस्त्यांवरील अनेक विकासाच्या योजना राबविल्या आहेत. पावसाळ्याात शेतकर्यांना आपल्या शेतात विविध आवजारे व यंत्र नेण्यासाठी चांगले शिवार रस्ते व्हावेत यासाठी १२३ गावाील पाणंद रस्त्यांकरिता १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना थोरात म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांनी सततच्या विकास कामातून संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल बनवला आहे. १७१ गावे व २५३ वाड्या-वस्त्यांवर सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या आहेत. नुकताच पाझर तलाव दुरुस्तीसाठी ७ कोटीं रुपयांचा निधी मिळविला आहे.
शेतपाणंद रस्ते हे शेतीतील कामासाठी व शेतीचे अवजारांची ने आण करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. यांत्रिकीकरणामुळे पेरणी, कापणी, मळणी, अंतरमशागत आदिंसाठी विविध मशीनरी वापरल्या जातात. पावसाळ्याात पाणी व चिखल यामुळे शेतात जाण्यास पानंद रस्ते हे अत्यंत उपयोगाची असतात.
तालुक्यातील विविध गावांमधील शेती शिवारात रस्त्यांच्या कामासाठी १ कोटी रुपयांचा निधी मिळवला असून यामध्ये निमोण, कर्हे, सोनेवाडी, पळसखेडे, सोनोशी, पिंपळे, पारेगांव बु व खु , नान्नज दुमाला, समनापूर, मालदाड, सुकेवाडी, खांजापूर, सायखिंडी, तळेगांव, चिंचोली गुरव, देवकौठे, तिगांव, करुले, लोहारे, कासारे, मिरपूर, वरझडी बु व खु , वडगांवपान, मेंढवण, कोंची – मांची, माळेगांव हवेली, निळवंडे, कोकणगांव, मनोली, पोखरी, कौठे कमळेश्वर, घुलेवाडी, गुंजाळवाडी, कासारा दुमाला, वेल्हाळे, धादंरफळ बु व खु, मंगळापूर, चिखली, सांगवी, कौठे धांदरफळ, मिर्झापूर निमज, निमगांव, भोजापूर, राजापूर, जवळे कडलग, चिकणी, वडगांव लांडगा, पिंपळगांव कोंझीरा, संगमनेर खुर्द, रायतेवाडी, कोळवाडे, जाखुरी, हिवरगांव पावसा,निमगांव टेंभी, शिरापूर, चंदनापूरी, सावरगांव तळ, झोळे, खांडगांव, नांदूरी दुमाला,निमगांव बु, सावरचोळ, शिरसगांव, जोर्वे, कोल्हेवाडी, निंभाळे, वाघापूर, खराडी, रायते, देवगांव, रहिमपूर, ओझर खु, उंबरी, अंभोरे, मालुंजे, डिग्रस, पानोडे, पिंपारणे, ओझर बु, कनकापूर, कनोली, आश्वी बु, निमगांव जाळी, चिंचपूर बु, औरंगाबाद, सादतपूर, प्रतापपूर , आश्वी खुर्द, शिवापूर, दाढ खुर्द, चणेगांव, खळी, हंगेवाडी, पिंप्री लौकी, शेडगांव, झरेकाठी, साकूर, जांबुत खु, हिवरगांव पठार, बिरेवाडी, जांभुळवाडी, कौठे मलकापूर, दरेवाडी, रणखांबवाडी, मांडवे बु, शिंदोडी, वरवंडी,खरशिंदे, खांबे, कर्जुले पठार, डोळासणे, काकडवाडी, शेंडेवाडी, जांभुळवाडी, पिंपळगांव देपा,नांदूर खंदरमाळ, खंदरमाळवाडी या गावांचा समावेश आहे. .
