12 जानेवारीला जयंती दिनानिमित्त गावोगावी अभिवादन
प्रतिनिधी —
याबाबत आवाहन करताना बाजीराव खेमनर म्हणाले की, भाऊसाहेब थोरात यांनी सहकारातून ग्रामीण भागामध्ये समृद्धी निर्माण केली. आर्थिक शिस्त, काटकसर व पारदर्शकता ही त्रिसूत्री सहकारात राबवून देशात आदर्श सहकाराचे मॉडेल निर्माण केले. आज संगमनेरचा सहकार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशात लौकिकास्पद ठरला आहे.
दरवर्षी अमृत उद्योग समूह व संगमनेर तालुक्याच्या वतीने 12 जानेवारी हा दिवस संपूर्ण तालुक्यात प्रेरणा दिन म्हणून साजरा होत असून मोठ्या उत्साहाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या जयंती महोत्सवानिमित्त सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ अण्णासाहेब शिंदे स्मृति पुरस्कार देऊन राज्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना गौरविण्यात येते. याचबरोबर दरवर्षी दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. हा जयंती महोत्सव उत्तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील मानबिंदू ठरला असून यावर्षी मात्र कोरोना च्या संकटामुळे साधेपणाने जयंती साजरी होणार आहे .
तरी प्रत्येक गावात कार्यकर्त्यांनी कोरोना चे नियम पाळून अभिवादन करावे असे आवाहन शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव पा. खेमनर व अमृत उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले आहे..
