बळीराजा संकटात असताना दिवाळी कशी साजरी करू ? महसूल मंत्री विखे पाटील

अधिकाऱ्यांच्या रजा रद्द ; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत देण्याचे प्रयत्न

प्रतिनिधी —

अतिवृष्टीमुळे नूकसान झालेल्या शेती पिकांचे सरकसकट पंचनामे, जनावरांचे लसीकरण आणि यापुर्वी मंजूर झालेली मदत शेतकऱ्यांना तातडीने मिळावी म्हणून सरकार काम करीत आहे. बळीराजा सकंटात असताना आम्ही दिवाळी साजरी करू शकत नाही. सर्व अधिकाऱ्यांना सतर्कतेने कार्यवाहीचे करण्याचे आदेश दिले असल्याने पुढील चार दिवस शेतकऱ्यांच्या बांधावर जावून सरकारच्या सर्व यंत्रणा काम करतील आशी ग्वाही महसूल पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

मंत्री विखे पाटील यानी शिर्डीत तसेच एकररूखे येथे झालेल्या नूकसानीची पाहाणी केली. तसेच दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात झालेल्या नूकसानीचा आढावा तालुका आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडून घेतला.

राज्यात एकीकडे पाऊस थांबायला तयार नाही आणि लम्पी आजाराचे प्रमाण वाढत असल्याकडे माध्यमांनी लक्ष वेधले असता मंत्री विखे पाटील म्हणाले की, अतिवृष्टीने नूकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहाणार नाही. असे आश्वासित करून त्यांनी सांगितले की, यापूर्वी नूकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात वर्ग करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मागील काही दिवसात पुन्हा झालेल्या अतिवृष्टीने नूकसानीचा नेमका आकडा समोर यायला वेळ लागेल. शेतात पाणी साचले असल्याने पंचनामे करण्यासाठी महसूल आणि कृषी विभागाची यंत्रणा पोहचू शकत नाही ही वस्तुस्थिती असली तरी, शक्य असेल तिथे सरसकट पंचनामे करण्याचे काम सुरू झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लम्पी आजाराच्या संदर्भात शासनाने यापुर्वी लसीकरण करण्याची कठोर अंमलबजावणी केल्यामुळे राज्यात या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले असल्याकडे माध्यमांचे लक्ष वेधतानाच, काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा या आजाराने डोके वर काढले असल्याची बाब चिंतेची असून, जनावारांचे तांडे आणि मोकाट फिरणाऱ्या जनावारांपासून पुन्हा लागण होत असल्याची शक्यता वर्तवून विखे पाटील

म्हणाले की, उपाय योजना म्हणून जनावरांना लसीची दुसरी मात्रा देण्याबाबतही निर्णय करण्याचा आपण गांभीर्याने विचार करीत असल्याचे सुतोवाच केले. जनावारांच्या आंतरराज्यीय बाजारावरही बंदी घालण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्यात बळीराजा संकटात असताना दिवाळी सण तरी कसा साजरा करणार म्हणून प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना पुढील चार दिवस शेतकऱ्यांच्या बरोबर राहून सर्व पंचनामे करण्याच्या तसेच पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून दिवाळीच्या सुट्या असल्यातरी, मी स्वतः पुढील चार दिवस विविध जिल्ह्यात जावून शेतकऱ्यांच्या भेटी घेणार असून, अधिकाऱ्यांच्या रजा रद्द करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मदतीबाबत विरोधकांकडून होत असलेल्या टिकेचा समाचार घेताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, त्यांच्याकडे आता बोलण्याशिवाय काहीही शिल्लक नाही. त्यांच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. शिंदे फडणवीस सरकार संवेदनशीलपणे काम करीत असल्यानेच अतिशय पारदर्शकपणे मदतीचे आणि शेतकरी हीताच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

राज्यातील विविध भरती प्रकीयेवर बोलताना मंत्री विखे म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौकरी मेळावा घेवून १० लाख तरुणांना नियुक्तीची पत्र दिली. राज्यातही ७५ हजार जागांची भरती करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने सर्वच विभागातील भरती प्रक्रीया पारदर्शकपणे सुरू होईल.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!