गोल्डन सिटी मधून पावणे दोन तोळ्यांची
“-गोल्डन चेन ” पळवली…
रविवारी भर दुपारची घटना
वार्ताहर
संगमनेर शहरातील गोल्डन सिटी या ठिकाणी राहणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातून सतरा ग्रॅम सोन्याची सोनसाखळी अज्ञात चोरट्यांनी मोटर सायकलवर येऊन गळ्यातून हिसकावून चोरून नेल्याची घटन घडली आहे.
समर्थ कॉलनी गोल्डन सिटीमध्ये काल रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सदर महिला घरातील कचरा घराच्या मागे टाकण्यासाठी गेली असता कचरा टाकून परत येत असताना काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांना थांबवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून नेली.
घटना घडल्यानंतर सदर महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलीस उपाधिक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
