ऐन दिवाळीच्या तोंडावर दुर्दैवी अपघात ; दोन युवक ठार एक, मुलगी जखमी
संगमनेर तालुक्यातील घटना

प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील संगमनेर नगर मार्गावर वडगाव पान फाटा येथे मोटरसायकल आणि डंपर यांच्या समोर समोर झालेल्या अपघातात दोन युवा मावस भाऊ डंपर खाली सापडून जागीच ठार झाले आहेत. व एक मुलगी जखमी झाली आहे. ही घटना आज गुरुवारी (दिनांक २० ऑक्टोबर २२) रोजी सकाळी घडली आहे. दिवाळीच्या तोंडावर अशी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

अक्षय तात्यासाहेब रोकडे (रा. दुर्गापूर ता. राहाता) आणि सुनील जालिंदर लांडगे (रा. वडगाव लांडगा, ता. संगमनेर) असे मयत मयत युवकांचे नाव आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथील सुनील जालिंदर लांडगे हे आपल्या मोटरसायकल वरून राहता येथे कामानिमित्ताने जात होते. त्यांच्या सोबत त्याचा मावसभाऊ अक्षय तात्यासाहेब रोकडे आणि रोकडे यांची मुलगी कावेरी तात्यासाहेब रोकडे (रा. दुर्गापुर, ता. राहता) हे जात असताना डंपर खाली सापडून या दोघांचा मृत्यू झाला आहे.

तर रोकडे यांची मुलगी कावेरी रोकडे ही गंभीरित्या जखमी झाली आहे. सुनील जालिंदर लांडगे व अक्षय तात्यासाहेब रोकडे अशी मतांची नावे आहेत.

मयत युवक एमएच १५ बीएफ ९३८७ या मोटरसायकल वरून जात असताना विना क्रमांकाच्या डंपरणे धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
