मारुतीची गदा चोरली !
प्रतिनिधी —
मंदिरातून दानपेट्या चोरण्याच्या घटना सर्वश्रूत आहेत. मात्र मारुतीची गदा चोरन्याचा प्रताप एका चोरट्याने केल्याचे उघड झाले आहे.
हनुमान मंदिरात प्रवेश करून दर्शन घेतले. मंदिराला प्रदक्षिणा मारल्या आणि प्रसाद ग्रहण केला. त्यानंतर मारुतीचे दर्शन घेऊन जवळपास दीड किलो वजनाची गदा चोरून नेऊन चोरटा पसार झाला आहे.

कान्हान रोडवर एक हनुमान मंदिर आहे. मंदिरात नेहमीच भाविकांची गर्दी असते. मागील आठवड्यात शनिवारी रात्रीच्या सुमारास एक चोरटा मंदिरात घुसला. त्याने मंदिरातील घंटा वाजवली. बाजूला ठेवलेली फुले घेतली आणि मारुतीच्या चरणावर ठेवून दोन्ही हात जोडून दर्शन घेतले. त्यानंतर मंदिराला प्रदक्षणा मारली. आणि मारुतीची पितळेची गदा चोरून घेऊन गेला. शनिवारी रात्री उशिरा पुजारी मंदिरात आले असता त्यांना गदाचोरीस गेल्याचे आढळून आले.
ही घटना नागपूर मध्ये घडली असून मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी गदा चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
