प्रतिनिधी
संगमनेर नगरपालिकेच्या अमरधाम बोगस टेंडर प्रकरणाने चांगलीच खळबळ उडवलेली आहे. भाजपने आंदोलनाचा पवित्रा घेत विविध मार्गाने आंदोलन करीत हे प्रकरण चव्हाट्यावर आणले. आज संगमनेर भाजपच्या वतीने
निविदा प्रक्रिया वैकुंठवासी झाली म्हणून प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
संगमनेर नगरपरिषदेची पारदर्शक प्रामाणिक निविदा प्रक्रिया वैकुंठवासी झाली असून तिची प्रतिकात्मक अंत्ययात्रा आज शनिवार दिनांक १ जानेवारी२०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता संगमनेर नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून निघेल. सर्व दुःखांकित नागरिक व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे अशी विनंती संगमनेर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.
सायंकाळी चार वाजता नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावरून ही अंत्ययात्रा निघणार असून शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरून अमरधाम मध्ये प्रतीकात्मक पुतळ्याचा अंत्यविधी करण्यात येणार आहे. अनोख्या पद्धतीने हा निषेध नोंदवण्यात येणार असून नगरपालिकेत होणाऱ्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश करण्याचे भाजपने ठरविले असल्याच्या प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
संगमनेर शहर भाजपचे अध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे, जावेद जहागीरदार, शिरीष मुळे, नगरसेविका मेघा भगत, दीपक भगत, सुनील खरे, किरपाल डंग आदी कार्यकर्त्यांनी या “वैकुंठवासी टेंडरच्या अंतिम यात्रेत” सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
Post Views: 44
