प्रतिनिधी
संगमनेर शहरातील अमरधामच्या नूतनीकरण व बांधकामाच्या संदर्भात लाखो रुपयांचा अपहार करण्याचा उद्देश स्पष्ट झालेला आहे. त्यामुळे  नियत साफ असेल तर नगराध्यक्षा किंवा नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी असे खोटे टेंडर काढून गुन्हा करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिस ठाण्यात फिर्याद द्यावी. असे आवाहन भाजपचे शहर अध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांनी केले आहे.
एकाच कामाचे तीन-तीन वेळा टेंडर काढून ते काम पूर्ण होत नसेल आणि त्यानंतरही लाखो रुपयाचे दोन बोगस टेंडर काढणे म्हणजेच अपहार करण्याचा उद्देश समोर येत आहे. त्यामुळे अमरधाम येथील स्मशानभूमीच्या कामा संदर्भाने सुमारे पस्तीस लाख रुपयाचे दोन बोगस टेंडर काढून नगरपालिकेतील कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी व तसा ठराव करणाऱ्या नगरसेवकांनी अपहार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे असे ठाम मत गणपुले यांनी व्यक्त केले.
आज भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी संगमनेर येथील हिंदु स्मशानभूमीतील अमरधाम या ठिकाणी नवीन कामाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी उपनगराध्यक्ष जावेद जागीरदार, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे, विद्यमान नगरसेविका मेघा भगत, दीपक भगत, माजी नगरसेवक शिरीष मुळे, सुनील खरे, कांचन ढोरे, प्रकाश राठी, किरपाल डंग आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
एकाच कामाचे वेगवेगळे टेंडर काढून नेमके हे टेंडर कोणत्या ठेकेदाराला देणे दिले जाणार होते ? तो ठेकेदार कोण ? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अमरधाम च्या कामाची पाहणी केली. जे काम पूर्ण झाले आहे त्याच्या नोंदी घेतल्या. जे काम अपूर्ण आहेत त्याच्याही नोंद घेण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी काम अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. एकंदरच अमरधामचे नुतनीकरण व बांधकाम आणि त्याविषयी निघालेले टेंडर हा आता कळीचा मुद्दा ठरलेला असून नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने या संदर्भात आंदोलन सुरू केले आहे. या आधी सुद्धा साखळी उपोषण, निवेदन, धरणे आंदोलन भाजपने केले आहे. आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अमरधाम येथे जाऊन सत्ताधारी आणि अपहार करणाऱ्या अधिकारी कर्मचारी व पदाधिकाऱ्यां विरुद्ध  घोषणा दिल्या.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!