जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा बंद करण्याच्या विरोधात छात्र भारतीचे ठिय्या आंदोलन !
प्रतिनिधी—
राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या विरोधात छात्र भारत विद्यार्थी संघटनेच्या वतीने संगमनेर बस स्थानक, व प्रांत कार्यलय समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

मराठी शाळा ह्या गोर गरीब जनते साठी महत्वाच्या आहेत. कोणाच्या बापाच्या नाहीत. असे छात्रभारतीने या आंदोलनात ठणकावून सांगितले. राज्यातील सतरा हजार पेक्षा जास्त शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. काय विरुद्ध विद्यार्थी आक्रमक झाले होते.

हे अत्यंत निषेधार्ह आहे, शासनाच्या या निर्णयाचा आणि गरिबांचे शिक्षण बंद करणाऱ्या मानसिकतेचा छात्रभारती तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

या निर्णयामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील गोरगरीब व विशेषतः आदिवासी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होणार आहे. शाळा घरापासून लांब गेल्यानंतर विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल. मुली तर शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकल्या जाण्याची परिस्थिती निर्माण होईल.

शासनाचा हा निर्णय शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन करणारा आहे. ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी, आदिवासी, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात टिकवून ठेवायचे असेल तर हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अश्या विनंती चे पत्रक प्रांत अधिकारी शशिकांत मंगरुळे यांच्या मार्फत शिक्षणमंत्री याना देण्यात आले.

यावेळी छात्रभारती राज्य कार्यवाह अनिकेत घुले, माजी अध्यक्ष दत्ता ढगे, गणेश जोंधळे, राहुल जऱ्हाड, विशाल शिंदे, तृप्ती जोर्वेकर, ओंकार अभंग, प्रतीक्षा भोसले, हर्षल कोकणे, अवंतिका जोर्वेकर, राधेश्याम थिटमें, सोनाली हांडे, शुभम कोल्हे, प्रसाद लोंढे, अजय ठोबरे, ज्योती भोसले, आकाश कोल्हे, वैष्णव कानवडे, साहिल जोर्वेकर, हृतिक वर्पे, शिवप्रसाद खताळ, विक्रम राहाणे, महेश वावरे, वैष्णवी घुले, प्रगती दिघे, ज्योती भोसले, कावेरी आहेर, ज्ञानेश्वरी कर्पे, आवजीनाथ गायकवाड, सिद्धार्थ हांडे, सुमित खरात, शिवप्रसाद खताळ, मोईन शेख, राम अरगडे, आदी सहकारी व विद्यार्थी या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी होते.

