चिंचपूर सोसायटीवर विखे पाटील गटाचे वर्चस्व

शेतकरी विकास मंडळाचा दारुण पराभव
प्रतिनिधी —
तालुक्यातील चिंचपूर येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत माजीमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाने तेराही जागांवर दणदणीत विजय संपादन करुन शेतकरी विकास मंडळाचा पराभव केला.
चिंचपूर सोसायटीच्या निवडणूकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागुन होते. जनसेवा मंडळ विरुध्द शेतकरी मंडळ अशा दोन गटांमध्ये ही लढत झाली. मात्र विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा मंडळाच्या उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी संघटीत शक्तीने शेतकरी मंडळाच्या उमेदवारांचा दारुण पराभव केला.

जनसेवा मंडळाचे उमेदवार सर्वश्री शत्रुघ्न विठ्ठल तांबे, संभाजी रामचंद्र तांबे, सावित्री संभु गवारे, बापुसाहेब निवृत्ती थेटे, मच्छिंद्र रामभाऊ लोखंडे, हौशिराम जनार्दन तांबे, नानासाहेब जगन्नाथ अनर्थे, शहाजी उमाजी मगर हे सर्वसाधरण गटातून विजयी झाले. महिला राखीव गटातून उज्वला संभाजी तांबे, शशिकला विठ्ठल तांबे. इतर मागास प्रवर्गातून सुनिल तबाजी तांबे. अनु जाती जमाती गटातून बाबासाहेब बाबुराव पारधे. भटक्या विमुक्त जाती गटातून नामदेव भगत गिधाड हे उमेदवार विजयी झाले आहेत.

सर्व विजयी उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्या उपस्थितीत विजयाचा जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. विजयी उमेदवारांचा सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले. चिंचपूर ग्रामस्थांच्या वतीने आमदार विखे पाटील आणि शालिनी विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कारखान्याचे संचाल कैलास तांबे, गिताराम तांबे, लक्ष्मण तांबे, गजाबा तांबे, श्रीरंग तांबे यांच्यासह चिंचपूर ग्रामस्थ, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
