मदर्स डे ! आई सोबत सेल्फी !! 

बालपण स्कूलच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी — 

मदर्स डे निमित्त आश्वी पानोडी येथील बालपण स्कूलच्या वतीने आयोजित केलेल्या ‘आई सोबत सेल्फी’ या स्पर्धेला विद्यार्थी आणि पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

निस्वार्थी प्रेम, निस्वार्थी माया म्हणजे आई…तिच्याबद्दलची कृतज्ञता म्हणजेच ‘मदर्स डे’ असल्याचे सोनाली मुंढे यांनी सांगितले.

आपल्या आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून मातृदिन जगात साजरा केला जातो. बालपण स्कूल व ज्ञानविद्या बहुउद्देशीय संस्था आयोजित मातृदिन स्पर्धा घेत साजरा केला. सध्याच्या या सोशल मिडिया च्या युगात नात्यात दुरावा होत चाललेला आहे.आपल्या आई प्रती नातं अधिक घट्ट व्हावं म्हणून बालपण स्कूल आश्वी व पानोडी या शाळेने उन्हाळी सुट्टी असतानाही स्पर्धा घरी राहून आयोजित केली.

बालपण स्कूल शैक्षणिक प्रगती बरोबरच विद्यार्थ्यांना संस्कार घडविण्यासाठी कटिबद्ध आहे. आजचा उपक्रम त्याचे एक प्रतिक आहे.

मानवी नातेसंबंधातील आणि जगातील वेगळ्या नात्यातील एक नातं माझं आईचं. आई आणि मुलांचं नात्याचे बंध म्हणजे अमूल्य प्रेमाची ठेव. आणि हीच ठेव ती आपल्या मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये ठेवत असते. आईची माया, प्रेम तिच्या मुलांच्यावरील मायेची तुलना जगातील कुठल्याच, कोणत्याच गोष्टीशी होऊ शकत नाही. आईच्या पोटी एकदा मुलं जन्माला आलं की, मग तिचं सगळं आयुष्य मुलासाठीच देऊन टाकते, तेही कोणताही स्वार्थ न ठेवता. या अशा निस्सीम प्रेमाच्या, मायेच्या आईसाठीच, तिचा गौरव करण्यासाठीच बालपण स्कूल साजरा केला जातो तो म्हणजे मदर्स डे.

या स्पर्धेसाठी बालपणच्या प्रमुख सोनाली मुंढे, बालोटे,जाधव, अनाप, घोडेकर, बोऱ्हाडे, गिते सर, आंधळे, पवार, आव्हाड, साबळे, घोडके, सोनवणे, शिंदे यांनी विशेष परिश्रम घेत ही स्पर्धा यशस्वी केली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!